राहण्यासाठी सर्वांत चांगल्या शहरांची यादी जाहीर झाल्यानंतर मुंबईत नवा वाद

राहण्यासाठी सर्वांत चांगल्या शहरांची यादी जाहीर झाल्यानंतर मुंबईत नवा वाद

स्मार्ट सिटी (Smart City) कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुंबई (Mumbai) शहर दहाव्या क्रमांकावर गेलं आहे.

  • Share this:

मुंबई, 5 मार्च : राहण्याजोगे शहर 2020 सर्वेक्षणात (Ease of Living Index) मुंबई शहर हे दहाव्या क्रमांकावर फेकले गेले आहे. यापूर्वी राहण्यासाठी चांगल्या शहरांच्या यादीत मुंबईचा क्रमांक हा आठवा होता. पुन्हा एकदा स्मार्ट सिटी (Smart City) कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुंबई (Mumbai) शहर दहाव्या क्रमांकावर गेलं आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विभाग मंत्रालयच्या वतीने गेले काही वर्ष अशा पद्धतीचे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणात दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरं आणि त्या पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांचे मूल्यमापन केले जाते. हे मूल्यमापन करत असताना त्या शहरातील हवामान पायाभूत सुविधांची उपलब्धता, घरांची उपलब्धता, रोजगार देणाऱ्या साधनांची उपलब्धता अशा अनेक पातळ्यांवर तपासणी केली जाते.

या तपासणी नुसार महाराष्ट्रातलं पुणे शहर हे राहण्यास योग्य शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आलं आहे. तर मुंबई शहर मात्र दहाव्या क्रमांकावर फेकले गेले आहे. या सर्वेक्षणात दहा लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले 49 शहरांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई, आणि बृहन्मुंबई यांचा पहिल्या दहा शहरांमध्ये समावेश आहे.

यादी जाहीर झाल्यानंतर मुंबईत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने

एकीकडे तीन शहरांचा पहिल्या दहामध्ये समावेश झाला ही आनंदाची बाब असली तरीही मुंबई दोन क्रमांकाने खाली घसरली आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या पण मुंबई महापालिकेत एकमेकांच्या विरोधात असलेल्या सेना-काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

हेही वाचा - पुण्याच्या फ्लाइटमध्ये सापडला कोरोना रुग्ण; टेक ऑफ आधी सगळ्या प्रवाशांना उतरवलं

केंद्र सरकार जाणीवपूर्वक महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी मुंबई सारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहराचं नामांकन खालील घेत आहे असा आरोप विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी केला आहे. तर स्थाई समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही या सर्वेक्षणाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. माझा या सर्वेक्षणावर विश्वास नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. एका औद्योगिक शहरासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मुंबईत आहे. यामुळे जाणीवपूर्वक मुंबईला बदनाम करण्याचा हा कट असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी हे तर महाविकास आघाडीचे कर्तृत्व आहे, असा उपरोधिक टोला लगावला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 5, 2021, 7:55 PM IST
Tags: BMCmumbai

ताज्या बातम्या