जगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर ?

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2018 07:34 PM IST

जगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर ?

मुंबई, 13 आॅगस्ट :  पुणे तिथे काय उणे हे उगाच म्हटलं जात नाही. जगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहरांच्या यादी पुण्याने पहिला क्रमांक पटकावलाय. तर गर्दीने बजबजपुरी झालेल्या मुंबई शहराला राहण्यायोग्य शहराच्या यादीत मेगा सिटी प्रवर्गात पहिला क्रमांक मिळालाय. सात मेगासिटीमधून मुंबईला हा अवॉर्ड देण्यात आलाय. तर देशभरातील सगळ्या शहरात मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.

शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोमवारी राहण्याजोग्या शहरांची यादी जाहीर केली. यात सांस्कृतिक शहर म्हणून नावलौकिक असलेलं पुणे हे अव्वल शहर ठरले आहे.  जगण्यासाठी पुणे शहर सर्वात चांगलं असल्याची मोहोर उमटलीये. पण मुंबई ही मेगासिटी असल्यामुळे तिचा पहिला क्रमांक पटकावलाय. तर देशाची राजधानी दिल्लीही 65 व्या स्थानावर आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या पाठोपाठ तिरुपती, चंदीगड, ठाणे, इंदूर, विजयवाडा आणि भोपाळ यांचा क्रमांक लागलाय.

हे सर्वेक्षण देशातील 111 शहरांमध्ये घेण्यात आलं. रस्ते, पाणी, वीज, वाहतुकीची साधनं, कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन याच्यावर मुल्यमापन करण्यात आलंय.

कसं झालं याचं मूल्यमापन

1)पायाभूत सुविधा

Loading...

रस्ते, पाणी, वीज, वाहतुकीची साधनं, कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन

2)सामाजिक--आरोग्य, शिक्षण, सुरक्षा,

3)आर्थिक--उत्पन्न, नोकऱ्या

4) प्रशासन

मात्र, मुंबई सगळ्यात घाणेरडं शहर आहे. राहण्यायोग्य नाही. माहीत नाही कसं काय रँकिंग मिळालं असा सवाल  विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थितीत केला.

 

स्वच्छ शहरातही मुंबई प्रथम

स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत मुंबई देशातली सर्वात स्वच्छ राजधानी ठरली होती. तर घनकचरा व्यवस्थापनातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार नवी मुंबई महापालिकेला मिळाला होता.

यात देशातील दुसरे सर्वोत्कृष्ट राज्यासह विविध विभागांत १० शहरे स्वच्छ ठरली. यातील ६ शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला. ४ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत देशातील चार हजार २०३ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

या स्पर्धेत झारखंड राज्याने सर्वोत्कृष्ट राज्याचे पहिले पारितोषिक मिळवले तर महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला. तर छत्तीसगडने तिसरा क्रमांक मिळविला. तर देशातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा मान इंदूर शहराने पटकावलाय. तीन लाख ते १० लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये सर्वात अधिक गतीने स्वच्छतेकडे वाटचाल करणाऱ्या शहरांमध्ये भिवंडी-निजामपूर शहरास प्रथम क्रमांक मिळाला तर छोटय़ा शहरामध्ये (एक ते तीन लाख लोकसंख्या) भुसावळ शहराने पारितोषिक पटकावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2018 07:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...