Home /News /mumbai /

प्रियंका गांधींचा तो फोटो शेअर करत मनसेच्या महिला नेत्या भडकल्या

प्रियंका गांधींचा तो फोटो शेअर करत मनसेच्या महिला नेत्या भडकल्या

आक्रमक शब्दांत रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.

    मुंबई, 3 ऑक्टोबर : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये जात बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. मात्र ही भेट घेण्यासाठी जात असताना वाटेत प्रियंका गांधी यांच्यासोबत पोलिसांकडून संतापजनक प्रकार घडला आहे. एक पुरुष पोलीस अधिकारी प्रियंका गांधी यांच्या कपड्याला हात लावत असल्याचं फोटोतून दिसत आहे. या घटनेबाबत चहुबाजूंनी टीका केली जात आहे. मनसेच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही एक फेसबुक पोस्ट लिहित या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. 'काय चाललंय युपी पोलिसांचे राव या पोलिसांचे कानफाड फोडले पाहिजे,' अशा आक्रमक शब्दांत रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. दुसरीकडे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या घटनेवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'क्या योगीजी के राज में महिला पोलीस नही है?' असा सवाल करत संजय राऊत यांनी प्रियंका गांधींना होत असलेल्या धक्काबुक्कीचा फोटो शेअर केला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड हेदेखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले. 'याची इतिहासात नोंद होईल आणि भविष्य माफ करणार नाही,' असं म्हणत आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसकडून इशारा प्रियंका गांधींसारख्या राष्ट्रीय नेत्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर महाराष्ट्र काँग्रेसही मैदानात उतरली आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी भाजपला इशारा दिला आहे. 'भाजपावालो, करारा जवाब मिलेगा,' असं ट्वीट सत्यजीत तांबे यांनी केलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: MNS, Priyanka gandhi

    पुढील बातम्या