• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • BREAKING : एकनाथ खडसेंना मोठा दिलासा, कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

BREAKING : एकनाथ खडसेंना मोठा दिलासा, कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

विशेष PMLA कोर्टानं खडसेंना 50 हजारांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

विशेष PMLA कोर्टानं खडसेंना 50 हजारांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

विशेष PMLA कोर्टानं खडसेंना 50 हजारांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

  • Share this:
मुंबई, 25 ऑक्टोबर : पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा (Pune land case) प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष PMLA कोर्टानं खडसेंना 50 हजारांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष PMLA कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीसाठी एकनाथ खडसे कोर्टात हजर होते. यावेळी कोर्टाने खडसे यांना दिलासा दिला आहे. विशेष PMLA कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केला आहे.  50 हजारांवर खडसे यांना जामीन देण्यात आला आहे. aryan Khan सोबत सेल्फी कुठे काढला? अखेर किरण गोसावीने दिली कबुली, म्हणाला... काही दिवसांपूर्वी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadses) यांच्याविरोधातही सेशन्स कोर्टाने अटक वॉरंट काढले होते. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांच्या अटकेची शक्यता होती. मात्र, मंदाकिनी खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी या प्रकरणात चौकशीसाठी हजर राहणार असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांचाही जामीन मंजूर झाल्यामुळे खडसे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहे प्रकरण? पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले.
Published by:sachin Salve
First published: