Home /News /mumbai /

महागाईचा भडका, आता PUC चाचणीचा दर वाढला, दुचाकींसाठी 50 ते चार चाकींसाठी 150 रुपये मोजा

महागाईचा भडका, आता PUC चाचणीचा दर वाढला, दुचाकींसाठी 50 ते चार चाकींसाठी 150 रुपये मोजा

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी सांगितले आहे.

    मुंबई, 13 मे : राज्य आणि देशात महागाईचा भडका उडाला आहे. भाजीपाल्यापासून ते प्रत्येक जीवनाश्यक वस्तूचा दर वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र GGIPR ने दिलेल्या माहितीनुसार आता दुचाकी आणि चार चाकी गाड्यांच्या PUC (Pollution Under Control) चाचणीचा दर देखील वाढला आहे. महाराष्ट्र GGIPR ने याबाबत फेसबुकवर माहिती दिली आहे. राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी सांगितले आहे. सुधारित दर तात्काळ अंमलात येत असून प्रत्येक वायुप्रदूषण तपासणीसाठी ते देय राहतील, असं त्यांनी नमूद केलं आहे. नवे आणि जुने दर काय? आधी दुचाकीसाठी 35 रुपये मोजावे लागत होते. पण आता त्यासाठी 50 रुपये आकारावे लागतील. आधी पेट्रोलवर चालणाऱ्या तीन चाकी वाहनासाठी 70 रुपये मोजावे लागत होते. पण आता त्यासाठी 100 रुपये द्यावे लागतील. तसेच CNG, LPG वर चालणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी आधी 90 रुपये किंमत होती. पण आता या वाहनांच्या पीयूसी चाचणीसाठी 125 रुपये मोजावे लागतील. तसेच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना आधी 110 रुपये खर्च येत होता. पण आता नव्या दरांनुसार 150 रुपये मोजावे लागतील. (खळबळजनक! Birthday दिवशीच तरुण अभिनेत्रीचा मृत्यू; नवऱ्यानेच केली हत्या?) प्रत्येक वाहनधरकाला PUC चाचणी करणं अनिवार्य आहे. वाहनाची PUC चाचणी केली नसल्यास वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. विशेषत: अनेकदा याबाबत दंडात्मक देखील कारवाई केली जाते. वाहनांमधून जास्त प्रदुषण होत नाही ना यासाठी PUC चाचणी केली जाते.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या