• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • पब, डिस्को, बार चालतात मग गणेशोत्सव का नाही? आशिष शेलारांचा सवाल

पब, डिस्को, बार चालतात मग गणेशोत्सव का नाही? आशिष शेलारांचा सवाल

राज्य शासनाच्या गृह विभागाने आज राज्यभर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे ही नियमावली म्हणजे गेल्यावर्षीच?

  • Share this:
मुंबई, 29 जून: पब (Pubs), डिस्को (Disco),बार (Bar) यांना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव (Ganpati Utsav) बंदिवासात अशी स्थीती राज्यात निर्माण झाली आहे, अशी टीका भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. ही टीका करण्याचे कारण असे की राज्य शासनाने (Maharashtra Government) आज गणेशोत्सव साजरा करताना जे नियम पाळायचे आहे त्याची नियमावली (Guidelines for Ganeshtosav in Maharashtra) जाहीर केली आहे. गृह विभागाने ही नियमावली जाहीर करताना या विषयाशी संबंधित कुठल्याच घटकाला म्हणजे गणेशोत्सव मंडळ, समन्वय समिती, मूर्तिकार यांना कुणालाही विचारात घेतले नाही. बैठका घेतल्या नाही. त्यामुळे मुंबईतील सर्वच गणेश मंडळ आणि समन्वय समितीचे सदस्य तसेच मूर्तिकार नाराज आहेत. शासनाने सरसकट गेल्यावेळी चे नियम लागू केले आहे. पण यावेळी परिस्थिती जरा वेगळी आहे. अनेकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. बायोबाबल तयार करून त्यात उत्सव साजरा करता आला असता अशी प्रतिक्रिया समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी दिली आहे. तर याच विषयावर आपली नाराजी व्यक्त करताना आमदार आशिष शेलार यांनी या अटी जाचक आहेत असं म्हटलं. आशिष शेलार म्हणाले, गणेशोत्सवावर याहीवर्षी ठाकरे सरकारने जे निर्बंध लादले आहेत ते एकतर्फी आहेत. गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल गणेशोत्सव महासंघ, मुर्तीकार संघटना वारंवार सरकारशी संपर्क करण्यासाठी प्रयत्न करीत असताना सरकारने कोणालाही विश्वासात न घेता गणेशोत्सवाची नियमावली आज जाहीर केली. यंदा कसा साजरा करायचा गणेशोत्सव; बाप्पाच्या मूर्तीपासून विसर्जनापर्यंत 12 नियम कारखान्यांमध्ये मूर्ती तयार करण्याचे काम चार महिने अगोदरच सुरु होते तेव्हा पासून मूर्तीकार संघटना सरकारला विचारणा करीत होते पण त्याकडे दुर्लक्ष केले. घरगुती गणेशाची मूर्ती 2 फुटाची असा निर्बंध का घालण्यात आला? मग कारखान्यात तयार झालेल्या मूर्तींचे आता काय करणार? या सगळ्यावर रोजगार म्हणून विसंबून असलेल्या कारागीर, कारखानदार यांना शासन काय मदत देणार आहे का? गतवर्षी पासून हा उद्योग अडचणीत आहे. त्यांना मदत तर दिली नाहीच पण आता ऐनवेळेस निर्बंध घालून त्यांची कोंडी ठाकरे सरकारने केली आहे. त्यामुळे सरकारने फेरविचार करावा असंही त्यांनी म्हटलं आहे. यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच! राज्य सरकारने गणेश मंडळांसाठी जाहीर केली नियमावली जर बंधने घालण्यात येणार असतील तर मूर्तीकरांना मदतीचे पॅकेज जाहीर करावे तेही शासनाचे कर्तव्य आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. गणेशोत्सवातील सर्व घटक आणि राजकीय पक्ष या सर्वांनाच शासनाने पुन्हा या नियमाचा विचार करावा आणि संवादातून मार्ग काढावा असे वाटत आहे. शासन या मागण्या किती मान्य करते ते पाहावं लागणार आहे.
Published by:Sunil Desale
First published: