मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईसाठी 50 हजार कोटींची तरतूद, शिक्षण व्यवस्थेतही मोठा बदल; यंदाचा BMC चा बजेट चित्र पालटणार?

मुंबईसाठी 50 हजार कोटींची तरतूद, शिक्षण व्यवस्थेतही मोठा बदल; यंदाचा BMC चा बजेट चित्र पालटणार?

BMC अर्थसंकल्प 2023-24

BMC अर्थसंकल्प 2023-24

मुंबई महानगरपालिकेला कायद्यानुसार 5 फेब्रुवारीपूर्वी अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे. त्यामुळे याकडे सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या काळातील 10 वा तर सीतारामन यांचा चौथा अर्थसंकल्प असणार आहे. मात्र, महाराष्ट्रातही मुंबई महानगरपालिकेचा 2023-24चा अर्थसंकल्प उद्या 2 फेब्रुवारीला सादर होणार आहे. सध्या बीएमसीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये मुंबई महापालिका सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपला. त्यामुळे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे कारभार पाहत आहेत. त्यामुळे मागील जवळपास 38 वर्षात पहिल्यांदाच बीएमसीचा अर्थसंकल्प हा प्रशासक सादर करेल. मुंबई महानगरपालिकेला कायद्यानुसार 5 फेब्रुवारीपूर्वी अर्थसंकल्प सादर करावा लागेल.

अर्थसंकल्पात यावर असणार भर -

बीएमसीच्या अर्थसंकल्पात कोस्टल रोड, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, शहराची गर्दी कमी करण्यासाठी नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे बांधकाम यासारखे अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत, ज्यासाठी हजारो कोटी रुपये लागतील, त्यासंदर्भात तरदूत केली जाण्याची शक्यता आहे. तसेच आरोग्य आणि पायाभूत सुविधांव्यतिरिक्त, शिक्षणासाठीही भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीचे शैक्षणिक बजेट 3,370.24 कोटी होते.

Union Budget 2023 LIVE : सर्वसामान्यांचे पैसे वाचणार की खिशाला फटका? थोड्याच वेळात निकाल

त्यात बीएमसीच्या शाळांनी ICSE, CBSE, आंतरराष्ट्रीय आणि केंब्रिज शिक्षण पद्धतींचा अवलंब केला आहे आणि डिजिटल वर्ग खोल्यांवर अतिरिक्त भर देऊन अनेक नागरी शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या क्षेत्रात अधिक अर्थसंकल्पीय तरतूद होण्याची शक्यता आहे. तसेच 2030 पर्यंत शून्य-कचरा अभियान, आणि पावसाळ्यात नवीन ड्रेनेज लाईन बांधून आणि नाले आणि नद्यांचे निर्जंतुकीकरण करून पाणी साचण्यापासून ते रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी देखील आर्थिक तरतुदीची आवश्यकता आहे.

Union Budget 2023 : बजेटमधून मिळणार गुडन्यूज, आयकरात मोठा बदल होण्याची शक्यता

इतक्या कोटींचा अर्थसंकल्प?

मागच्या वर्षी कोरोनाची परिस्थिती पाहता आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे सुरू करण्यासाठी, BMC ने आपल्या आरोग्य बजेटमध्ये 15 टक्के वाढ केली होती आणि आरोग्य क्षेत्रासाठी अतिरिक्त 1,800 कोटींची तरतूद केली होती. तसेच मागच्या वर्षी, मुंबई पालिकेने 45,949.21 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यावर्षी बजेट 4500 कोटींनी वाढ होऊन हा अर्थसंकल्प सुमारे 50,000 कोटींवर जाऊ शकतो. यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांसाठी आर्थिक तरतुदीची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा आणि आरोग्यासाठी भरीव तरतूद केली जाणार आहे.

First published:

Tags: BMC, Budget 2023, Maharashtra Budget, Nirmala Sitharaman