डोंबिवलीमधलं राजकीय वातावरण तापलं

डोंबिवलीमधलं राजकीय वातावरण तापलं

गाढवावरून धिंड काढून दानवे यांना विरोध केल्याचा प्रकाराचा बदला घेण्यासाठी भाजप नगरसेवक महेश पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या तोंडाला काळं फासलं . या प्रकारानंतर डोंबिवलीत राजकीय वातावरण प्रचंड तापलं.

  • Share this:

प्रदीप भणगे, 12 मे : रावसाहेब दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गुरुवारी शिवसेनेनं डोंबिवलीत गाढवावरून धिंड काढली होती. त्यानं नंतर कल्याण जिल्हा भाजपने सामना मुखपत्र जाळत शिवसेनेचा विरोध केला.ह्याचाच पडसाद काल रात्री( दि 12)उमटला.

गाढवावरून धिंड काढून दानवे यांना विरोध केल्याचा प्रकाराचा बदला घेण्यासाठी भाजप नगरसेवक महेश पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या तोंडाला काळं फासलं . या प्रकारानंतर डोंबिवलीत राजकीय वातावरण प्रचंड तापलं रात्री उशिरा शिवसेनेनं पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत भाजपाच्या कार्यालयाच्या आवारात दगडफेक केली आणि भाजप कार्यालयाची पाटी तोडली.

या प्रकारानंतर काही वेळातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि डोंबिवलीत एकच खळबळ उडाली. त्यामुळे संतप्त शिवसैनिक ठाणे,दिवा,डोंबिवली,कल्याण व अंबरनाथ मधील कार्यकर्ते जमा झाले. रात्री साडेअकराच्या सुमारास रामनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि राव साहेब दानवे यांचा पुतळा जाळून जोरदार घोषणा दिल्या.

यावेळी रस्त्यात भाजपचं कार्यालय लागल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी कार्यालयाच्या आवारात  दगडफेक केली आणि पाटी तोडली. तसंच नंतर रामनगर पोलीस ठाण्यातही महेश पाटील यांना ताबडतोब अटक करण्याची मागणी करत गोंधळ घातला. पोलिसांनी महेश पाटील विरोधात गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार झालाय.

यावेळी पोलीस ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शुक्रवारच्या दिवसात जर महेश पाटीलला पोलिसांनी अटक केली नाही, तर कायदा हातात घेण्याची थेट धमकी यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिली.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर डोंबिवलीतलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून शिवसेना आणि भाजप या केंद्रात, राज्यात आणि केडीएमसीतही एकत्र नांदणाऱ्या दोन पक्षांमध्ये मोठं तणावाचं वातावरण आहे. त्यामुळं महेश पाटील आणि  त्यांच्या कार्यकर्त्यांना जर अटक झाली नाही, तर शिवसेना पुढे काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.

सेना-भाजपच्या भांडणात मनसेनी घेतली उडी

डोंबिवलमधील सेनाभाजप आंदोलनावर मनसे टीका केली आहे. शिवसेना भाजपने नौटंकी चॅनेल सुरू करावं. 'कोण बोले साल्यावर कोण बोले नाल्यावर' असx युती सरकार करत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकउपयोगी,समाजहिताच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलनं करुन सत्ताधारी शिवसेना भाजपचं पितळ उघडं केल्यावर सत्ताधारी जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी सत्तेत एकत्र असूनही एकमेकांविरुद्ध स्टंटबाजीचं आंदोलन करत आहेत.शिवसेना आणि भाजप राज्यांत आणि  महापालिकेत सत्तेची मलई मांडीला मांडी लावून खात आहेत आणि जनतेनी दिलेल्या कौलाचं मोल यांना राहिलेलं नसून रोज नव्या लुटुपुटुच्या भांडणांचे नवनविन एपिसोड समोर आणून जनतेची शुद्ध फसवणूक करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 01:57 PM IST

ताज्या बातम्या