लग्नानंतर 5 दिवसांनी प्रियांकाची केली हत्या

लग्नानंतर 5 दिवसांनी प्रियांकाची केली हत्या

प्रियांकाचा पती सिद्धेश गुरव, सासरा मानिहार गुरव, सासू माधुरी गुरव तर सिद्धेशचा मित्र दुर्गेश पाटवा याला ही नवी मुंबई पोलिसांनी अटक केलीय.

  • Share this:

14 मे : मुंबईच्या वरळीतील प्रियांका खून प्रकरणात सासरच्या लोकांसह चार जणांना अटक करण्यात आलीय. तर प्रियांकाच्या मृतदेहाचे दोन्ही पाय  शिळफाटा इथं सापडलेत. प्रियांकाच्या डोक्याच्या भागाचा अजून शोध सुरू आहे.प्रियांकाचा पती सिद्धेश गुरव, सासरा मानिहार गुरव, सासू माधुरी गुरव तर सिद्धेशचा मित्र दुर्गेश पाटवा याला ही नवी मुंबई पोलिसांनी अटक केलीय.

प्रियांकाचं लग्न करण्याच्या हट्टामुळे सिद्धेशने हत्या केल्याचं समोर आलंय. प्रियांका आणि सिद्धेशच्या लग्नाला अवघे पाच दिवस झाले होते. त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता.

प्रियांकाच्या हातावरची मेहंदीचा रंगही गेला नाही तोच तिची निर्घृणपणं हत्या करण्यात आलीये. तिची हत्या साताजन्माची साथ देण्याची शपथ घेतलेल्या तिच्या नवऱ्यानंच केलीये. प्रियांका आणि सिद्धेश गुरवचा 30 एप्रिलला प्रेमविवाह झाला होता. सिद्धेशनं प्रेम केलं पण त्याला लग्न करायचं नव्हतं. पण प्रियांकानं लग्नाचा तगादा लावल्यानं सिद्धेश आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिचा कायमचा काटा काढला.

प्रियांकाच्या हत्येतील दोषींना फाशी द्यावी अशी मागणी प्रियांकाच्या बहिणीने केलीय. दोषींना फाशी मिळेपर्यंत आम्ही न्यायालयीन लढा देऊ आणि प्रियांकाला न्याय मिळवून देऊ, असं तिनं म्हटलंय.

प्रियांकाच्या सासू सासऱ्यांचा लग्नाला विरोध होता. लग्न करून हत्या करायची होती तर लग्नच का केला असा सवाल प्रियांकाच्या नातेवाईकांनी केलाय.

First Published: May 14, 2017 04:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading