Home /News /mumbai /

काम बंद करून घरी बसणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही, आरोग्य मंत्र्यांनी दिला हा इशारा

काम बंद करून घरी बसणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही, आरोग्य मंत्र्यांनी दिला हा इशारा

मुंबईत 15 हजार डॉक्टर क्लिनिक बंद करून घरी बसले आहेत. आम्ही त्यांना सेवा सुरू करण्याचं आवाहन केलं आहे.

मुंबई 06 मे: कोरोनाच्या नावाखाली अवाजवी दर लावत रुग्णांकडून पैसे लुटणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सला सरकारने चांगलाच दणका दिला आहे. अशा गोष्टींना चाप लावण्यात येणार असून सर्व दर हे ठरवून दिले जातील. त्यापेक्षा जास्त दर आकारणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. काम बंद करून घरी बसणाऱ्या डॉक्टरांनी त्यांचा दवाखाना सुरू करावा. असं केलं नाही तर त्यांची सरकारी हॉस्पिटलमध्ये ड्युटी लावू असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईत 15 हजार डॉक्टर क्लिनिक बंद करून घरी बसले आहेत. आम्ही त्यांना सेवा सुरू करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी ऐकलं नाही तर त्यांची शासकीय रुग्णालयात सर्व्हिस करू. आम्ही त्यासाठी त्यांना मोबदलाही देऊ. आम्हाला फुटक नको. आम्ही 15 दिवसांसाठी 50 हजार त्यांना देतो. जे डॉक्टर 55 वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत. किंवा ज्यांना इतर रोग आहे त्यांनी वगळून इतरांनी राज्याला सेवा दिली पाहिजे. सरकारने त्यांच्यावर खर्च केला आहे असंही ते म्हणाले. आरोग्य विभागात 25 हजार भरती करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ते म्हणाले, सरकारचा मोठा निर्णय! रिक्षाचालक, धोबी, न्हावी, शेतकरी, कामगारांना बेरोजगार भत्ता मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्या नंतर आरोग्य क्षेत्रातील एकही जागा आता रिक्त ठेवणार नाही. सर्व कर्मचारी वर्ग भरण्यासाठी तात्काळ संबधीत सचिवांना आदेश देण्यात आले आहेत. प्रमोशन देखील तात्काळ करण्यात येणार आहेत. यात येत्या काही महिन्यांमध्ये 25 हजार भरती करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभाग अशा सर्वांचे रिक्त जागा भरण्यात येणार.' आरोग्य मंत्री म्हणाले, कोविड19 महामारीचा गैरफायदा कोणीच घेऊ नये. अशा गोष्टींना सरकार चाप लावणार आहे. यासाठी नियोजनही करण्यात आलं आहे. कुठल्या गोष्टींना किती शुल्क आकारावं हे निश्चित करण्यात आलं आहे. त्याच्या बाहेर आता खासगी हॉस्पिटल्सला आता जाता येणार नाही. नाहीतर आम्ही कारवाई करणार आहोत. पश्चिम बंगालच्या मजुरांची फरफट; 2400 जणांना स्वीकारण्यास ममता सरकारचा नकार ते पुढे म्हणाले, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी दुपारी सखोल चर्चा झाली. आम्ही सविस्तर आढावा घेतला. केंद्राच्या सूचनांची पूर्ण पालन करण्यात येत असून नवे उपाय योजण्यात येणार आहेत. लॅबवर देखील लोड येत आहे. नवीन रुग्णांच्या टेस्ट करणं देखील महत्वाचं आहे. क्वारंटाइनचा 14 दिवसांचा कालावधी कमी करण्यात येऊ शकतो का? या संदर्भात ICMR नियमावली जाहीर करणार आहे. 1 लॅब वरून आता 54 लॅब सुरू केल्या आहेत. राज्यात दररोज 10 हजार टेस्ट होत आहेत. महाराष्ट्र हे रुग्णांच्या टेस्ट करण्यात क्रमांक एक वर आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या