शिक्षकाकडे सापडल्या 1 हजारांच्या 2300 नोटा, बदलण्यासाठी जाताना पोलिसांनी पकडले

शिक्षकाकडे सापडल्या 1 हजारांच्या 2300 नोटा, बदलण्यासाठी जाताना पोलिसांनी पकडले

एका शिक्षकाकडे एक हजाराच्या तब्बल 2 हजार 300 नोटा मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील या शिक्षकाला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने ताब्यात घेतलं होतं.

  • Share this:

ठाणे, 11 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. नोटाबंदी करण्यात आलेल्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी त्यावेळी ठराविक कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर आतापर्यंत अनेक वेळा नोटाबंदी झालेल्या नोटा सापडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

दरम्यान, ठाण्यातील एका शिक्षकाकडे एक हजाराच्या तब्बल 2 हजार 300 नोटा मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील या शिक्षकाला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने ताब्यात घेतलं होतं. तसंच त्याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चलनातून रद्द करण्यात आलेल्या एक हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी हालचाली सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. वेस्टर्न मेगा हायवेशेजारी असलेल्या सर्व्हिस रोडजवळ ही गाडी येणार असल्याचं समजलं होतं. माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून 45 वर्षीय शिक्षकाला ताब्यात घेतल.

धक्कादायक! शिक्षकच झाले हल्लेखोर, शाळेच्या संस्थापकावर जीवघेणा हल्ला

मुंबईतल्या साकीनाका इथं हा शिक्षक राहत असल्याचं समजते. त्याच्याकडून 1 हजार रुपयांच्या 2300 नोटा जप्त करण्यात आल्या. त्याच्या जबाब नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चौकशी केल्यानंतर शिक्षकाला सोडून देण्यात आल्याचंही समजते.

आजोबा-नातीच्या नात्याला काळीमा, 40 वर्षीय नराधमाचा 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

First published: February 11, 2020, 8:06 PM IST

ताज्या बातम्या