दादरजवळ खासगी बस उलटून एक ठार, 35 प्रवासी जखमी

दादरजवळ खासगी बस उलटून एक ठार, 35 प्रवासी जखमी

  • Share this:

21 मे : मुंबईतील दादरजवळ खासगी बस उलटून झालेल्या विचित्र अपघातात एक प्रवासी ठार झाला आहे. या अपघातात 35 जण जखमी झाले असून जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दादर टीटी फ्लायओव्हरजवळ आज (रविवारी ) पहाटे 5 वाजता हा भीषण आणि विचित्र अपघात झाला. देवरुखहून मुंबईला येत असताना पुलाच्या डिव्हायडरला धडक बसल्याने या बसचा अपघात झाला. या अपघातात बसमधले 35 प्रवासी जखमी झाले असून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, अपघातामुळे दादर टीटीजवळ काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आता अपघातग्रस्त बस हटवण्यात आली असून रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2017 10:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...