मुंबई, 21 जानेवारी : सध्या कोरोनामुळे सर्वच गोष्टी ऑनलाइन (Online) सुरू आहेत. शाळा, कार्यालये देखील ऑनलाइनच्या पर्यायाचा अवलंब करीत आहेत. धक्कादायक बाब (Mumbai, Dadar) म्हणून मुंबईतील दादर भागातील एका बँक मॅनेजरने खातेदारांचे पैसेदेखील ऑनलाइन सट्ट्यात उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व प्रकारामुळे खातेदारांना जबर धक्काच बसला आहे. (private bank manager in Mumbai Billions of rupees were spent on online betting)
मुंबईतील दादर भागातील एका खासगी बँकेच्या मॅनेजरला ( Bank Manager) ऑनलाइन सट्टा खेळण्याचा नाद होता. या नादात त्याने खातेदारांचे कोट्यवधी रुपये सट्ट्यात उडवले. या पठ्ठ्याने खात्यातील रक्कम परस्पर वळवली. बँक मॅनेजरने तब्बल 1 कोटी 85 लाख रुपये सट्ट्यात गमावले आहेत. या प्रकरणात बँकेतील दादर शाखेतील उपशाखा व्यवस्थापक विशाल गरूड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदपत्रांच्या छाननीत नोंदीपेक्षा रोकड जास्त असल्याचं दिसलं. मात्र प्रत्यक्ष तपासणात १ कोटी ८५ लाखांचा तुटवडा असल्याचं समोर आलं होतं.
हे ही वाचा-
हातात सिगारेट, तोंडात शिव्या; 19 वर्षीय लेडी डॉन अखेर पोलिसांच्या अटकेत
त्यानंतर विशालनं बनावट व्यवहारांची नोंद करून बुकींच्या ९ बँक खात्यांमध्ये रक्कम जमा केल्याचं समोर आलं आहे. त्याच्याविरोधात माटुंगा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.