• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मुंडे समर्थकांनी मुंबईत बोलावली बैठक; पंकजा मुंडेंच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

मुंडे समर्थकांनी मुंबईत बोलावली बैठक; पंकजा मुंडेंच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Munde supporters called meeting: मुंडे समर्थकांनी मुंबईत एका बैठकीचं आयोजन केलं असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:
मुंबई, 11 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet Reshuffle) झाला असून त्यात महाराष्ट्रातील चार नेत्यांना स्थान देण्यात आले. मात्र, खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश झाला नाही. यामुळेच मुंडे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. नाराज झालेल्या मुंडे समर्थकांचे गेल्या तीन दिवसांपासून राजीनामा सत्र सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. त्याच दरम्यान आता मुंडे समर्थकांनी मुंबईत एका बैठकीचं आयोजन (Munde supporters meeting in Mumbai) केलं आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंडे समर्थकांनी (Munde supporters) मुंबईत एका बैठकीचं आयोजन केलं आहे. ही बैठक मंगळवार 13 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता मुंबईतील वरळी भागात होणार आहे. या बैठकीच्या संदर्भातील बॅनर्सही सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. ज्यावर चलो मुंबईचा नारा देण्यात आला आहे. तसेच दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा फोटोही आहे. सलग तिसऱ्या दिवशी राजीनामा सत्र सुरू; पंकजा मुंडे दिल्लीत मोदींच्या भेटीला, पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? सेना-भाजपचे नेते एकाच व्यासपीठावर; शिवसेना - भाजपची युती होणार? नितेश राणेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण पंकजा मुंडेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असं म्हटलं जात आहे की, मुंडे समर्थकांनी आयोजित केलेल्या या बैठकीत पंकजा मुंडे भाषण करणार आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे या बैठकीत काय भाष्य करतात, तसेच काय निर्णय घेतात? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. पंकजा मुंडे पंतप्रधान मोदींच्या भेटीला दिल्लीत भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांची एक बैठक आयोजित कऱण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे दाखल झाले आहेत. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सचिवांची जवळपास दीड तास बैठक झाली. या बैठकीत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक जबाबदारी आदी विषयावर विस्ताराने चर्चा झाली. त्यानंतर सद्या पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे. महत्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डॉ प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्यामुळे मुंडे समर्थक कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे राज्यात राजीनामा सत्र सुरू असून यावर बैठकीत काय चर्चा होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Published by:Sunil Desale
First published: