वाधवान कुटुंबीयांना VIP पास देणं पडलं महागात, अमिताभ गुप्तांवर सरकारची मोठी कारवाई

वाधवान कुटुंबीयांना VIP पास देणं पडलं महागात, अमिताभ गुप्तांवर सरकारची मोठी कारवाई

वाधवान यांना दिलेला VIP पास गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी डोकेदुखी ठरला. त्यावरून जोरदार टीका होत असताना रातोरात गुप्तांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची वेळ आली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल : DHFL चे प्रमोटर्स आणि YES BANK घोटाळ्यात आरोप असलेले कपील आणि धीरज वाधवान बंधू यांच्यासह कुटुंबियांना लॉकडाऊनदरम्यान प्रवासाचे VIP पास देणं चांगलच भोवलं आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत गृह विभाग विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गृहमंत्रालय आणि सरकारकडून याची तातडीनं चौकशी करून योग्य ती कारवाई कऱण्यात येईल असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख्य यांनी दिलं आहे.

काय आहे प्रकरण...

DHFL चे प्रमोटर्स आणि YES BANK घोटाळ्यात आरोप असलेले कपील आणि धीरज वाधवान बंधू यांनी लॉकडाऊनची उल्लंघन केल्याचं उघड झालं आहे. 144 कलमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. हे वाधवान बंधू आपल्या 5 अलिशान कार्स मधून 23 कुटुंबीयांना घेऊन मुंबईहून महाबळेश्वरला लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असतानाही गेले होते. या प्रवासासाठी त्यांनी थेट गृहमंत्रालयातून पत्र मिळालं होतं.

हे वाचा-देशभरात 24 तासांत 591 नवीन पॉझिटिव्ह केसेस, कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,865 वर

या प्रकरणाविरोधात विरोधी पक्षातील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी ही यावरून थेट गृहमंत्र्यांवर संशयाचे बोट दाखवले, अखेर रात्री उशीरा गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमिताभ गुप्ता यांना परवानगी कशी दिली, याची चौकशी करण्यात येईल तोपर्यंत गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल असे गृहमंत्र्यांनी ट्वीट करून सांगितलं आहे. Yes बॅक प्रकरणात संशयित आरोपी असलेले वाधवान यांना दिलेला VIP पास गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी डोकेदुखी ठरला, त्यावरून जोरदार टीका होत असताना रातोरात गुप्तांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची वेळ आली, आता भलेही देशमुख यांनी ही भूमिका घेतली असली तरी विरोधक याच मुद्दावरून अजून आक्रमक होत गृहमंत्र्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संपादन- क्रांती कानेटकर.

हे वाचा-कोरोनाला नमवणारा 'भीलवाडा पॅटर्न', टीना डाबीने सांगितलं कसा दिला लढा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2020 07:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading