Home /News /mumbai /

पंतप्रधान मोदी आमचे नेते, त्यामुळे..., संजय राऊतांचे मोठे विधान

पंतप्रधान मोदी आमचे नेते, त्यामुळे..., संजय राऊतांचे मोठे विधान

'पुण्यात सर्वांचं स्वागत केलं जातं. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्याचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले आहे'

    मुंबई, 28 नोव्हेंबर : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुण्याच्या दौऱ्यावर आहे. पुणे (Pune) हे सांस्कृतिक शहर आहे, महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्याचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले आहे. मोदी हे आमचे नेते आहे, त्यांचे स्वागत करणे हे आमचे कर्तव्य आहे', असं मत शिवसेनेचे (Shivsnea) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले. मुंबई पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. 'महाराष्ट्र आणि पश्चिम बंगलावर दबाव टाकला जात आहे. ते होणार हे माहीत आहे. पण संघर्ष करण्याची आम्हाला सवय आहे. प्रेशर पॉलिटिक्स कोणाला करायचं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो. प्रेशर पॉलिटिक्स जे कोणी करत आहेत, त्यांचं स्वागत आहे. जे कोणी हे करत कुठं केलं जातं सर्व आम्हाला माहीत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्याय व्यवस्था दबाव आणलं जात आहे' अशी टीकाही राऊत यांनी केली. 'या कारवाईतून ज्यांना कोणाला यातून विकृत आनंद मिळत आहे, त्यांनी तो घेतला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती आहे , वेगळी परंपरा आहे. आता जे चाललं आहे, ही इस्ट इंडिया कंपनीची परंपरा आहे. आपल्या हवं आहे ते मिळवणं, विरोध करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे, त्यांनी विधायक काम केलं पाहिजे. विरोधीपक्षानी आपली शक्ती लोकांच्या कामासाठी लावली पाहिजे', असा टोलाही राऊत यांनी विरोधकांना लगावला. 'पुण्यात सर्वांचं स्वागत केलं जातं. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्याचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले आहे. मोदी हे आमचे नेते आहे, त्यांचे स्वागत करणे हे आमचे कर्तव्य आहे. मोदी देशाचं पंतप्रधान आहे कायम आदर आहे', असंही राऊत म्हणाले. 'कंगना रणौतच्या कार्यालयावर तोडकाम केल्या प्रकरणी  महापौर यांनी सूचक विधान केलं आहे. बेकायदेशीर बांधकाम वर कारवाई होती. बेकायदेशीर बांधकामवरील कारवाई बेकायदेशीर कशी ठरली यासाठी मी संविधानाची काही पुस्तक शोधत आहे', असाही राऊत यांनी टोला लगावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या