Home /News /mumbai /

पंतप्रधान मोदींनी केला शरद पवारांना फोन, तब्येतीची केली विचारपूस

पंतप्रधान मोदींनी केला शरद पवारांना फोन, तब्येतीची केली विचारपूसशरद पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून तब्येतीची चौकशी केली.

शरद पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून तब्येतीची चौकशी केली.

शरद पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून तब्येतीची चौकशी केली.

    मुंबई,  24 जानेवारी: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP president) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाची (Corona Positve) लागण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी शरद पवारांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली आहे. कोरोनाच्या दोन लाटेत अनेक राजकीय नेत्यांना लागण झाली होती. मात्र, याला शरद पवार हे अपवाद ठरले होते. कोरोनाच्या काळात शरद पवार यांनी दौरे केले होते. पण, तरीही त्यांना कोरोना स्पर्शही करू शकला नाही. मात्र, आता तिसऱ्या लाटेत शरद पवारांना कोरोनाने गाठले आहे. आज दुपारीच शरद पवार यांनी आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दिली. शरद पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून पवारांच्या तब्येची चौकशी केली. पंतप्रधान मोदी सध्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकी प्रचारात व्यस्त आहे, याही व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पंतप्रधानांनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. पंतप्रधानांनी फोन करून चौकशी केल्याबद्दल शरद पवारांनी आभार मानले आहे. दरम्यान, शरद पवार यांना  कोरोनाची सौम्य लक्षण असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच संपर्कात असलेल्या लोकांनी टेस्ट करुन घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे सुरू असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. राज्यातल्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातले अनेक मंत्री आणि विविध पक्षांतले अनेक प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली. यातल्या काही मंत्री आणि नेत्यांनी कोरोनावर मात केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या