Home /News /mumbai /

पंतप्रधान मोदी आज 6 वाजता देशाला संबोधित करणार, काय बोलणार याकडे लक्ष्य

पंतप्रधान मोदी आज 6 वाजता देशाला संबोधित करणार, काय बोलणार याकडे लक्ष्य

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशाला संबोधित करणार आहे. संध्याकाळी 6 वाजता ते बोलणार आहे.

    मुंबई, 20 ऑक्टोबर : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशाला संबोधित करणार आहे. संध्याकाळी 6 वाजता ते बोलणार आहे. त्यामुळे पंतप्रधान काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ट करून याबद्दल माहिती दिली आहे. आज संध्याकाळी 6 वाजता ते देशाला संबोधित करणार आहे, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे आज कोणती घोषणा करणार आहे, महाराष्ट्राला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्याबद्दल काही मदतची घोषणा करणार आहे का, हे पाहण्याचे ठरणार आहे. दरम्यान, केंद्र सरकार दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा अंदाज आहे.  हे उपभोक्‍ता मूल्‍य सूचकांक म्हणजेच CPI-IW च्या बेस इअर म्हणजे या वर्षात बदल केल्यामुळे शक्य होऊ शकेल. या नव्या बदलामुळे 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होईल. रिपोर्ट्सनुसार येत्या 21 ऑक्टोबर रोजी सरकार CPI-IW च्या आधार वर्षात बदल करू शकते आणि सविस्तर माहिती जारी करू शकते. या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने डीए देण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे आणि याची प्रक्रियादेखील सुरू होणार होती. मात्र मार्चमध्ये कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये डीए देण्यावर बंधन लावले. हे नियंत्रण 2021 पर्यंत लावण्यात आले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या