S M L

आवक वाढल्याने भाज्यांचे भाव घसरले

बाजारात भाज्यांची विक्रमी आवक झाल्याने भाव 30 टक्क्यांनी खाली आले आहेत.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 4, 2017 01:33 PM IST

आवक वाढल्याने भाज्यांचे भाव घसरले

मुंबई, 04 सप्टेंबर: मुंबईला भाजी पुरवठा करणाऱ्या एपीएमसीमध्ये भाज्यांचे भाव घसरले आहेत. बाजारात भाज्यांची विक्रमी आवक झाल्याने भाव 30 टक्क्यांनी खाली आले आहेत.

दररोज या बाजारपेठेत सरासरी 500 ते 550 गाड्या भाजी पुरवठा करतात. आज ही आवक 850 गाड्यांवर गेली आहे. गणेशोत्सव, पाऊस आणि सुट्टयांमुळे आज शेतकऱ्यांनी शेतातला शेतमाल बाजारात पाठवल्याने आवक वाढली आहे. वर्षभरात अशी विक्रमी आवक होण्याची ही दुसरी वेळ आहे.

एपीएमसी बाजारपेठेत घसरलेले भाव


भेंडी - 22 रु किलो

फरसबी - 20 रु किलो

गाजर - 16 रु किलो

Loading...

कारली - 25 रु किलो

मिरची - 22 रु किलो

वाटाणा - 40 रु किलो

वांगी - 15 रु किलो

कोथिंबीर - 15 रु जुडी

टोमॅटो - 24 रु किलो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2017 01:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close