मुंबई, 18 एप्रिल : राज्यात एकीकडे रेमडेसीवीर इंजेक्शनचा (remdesivir injection) तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे भाजप (BJP )आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Government) आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. मुंबई पोलिसांनी ब्रुफ्र फार्माच्या (Bruffer Pharma) संचालकाला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी हस्तक्षेप करणे योग्य नव्हते, असं म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी कारवाईचे संकेत दिले आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना दिलीप वळसे पाटील यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.
शनिवारी रात्री मुंबई पोलिसांनी ब्रुफ्र फार्माच्या संचालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतले होते. मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती की, 50 हजार रेमडेसीवीर येत आहे. त्याची चौकशी ब्रुफ्र फार्मा अधिकारी यांनी बोलवले होते, असा खुलासा वळसे पाटील यांनी केला.
ज्यावेळेस संबंधित अधिकाऱ्याला चौकशीला बोलावले होते. तेव्हा फडवणीस आणि दरेकर यांनी हस्तक्षेप तिथ केला. पोलीस चौकशी करायची असेल तर कोणास ही बोलवू शकतो. शासकीय कामात हस्तक्षेप त्यांनी केला पोलिस दबाव टाकणे योग्य नाही, अशी टीका वळसे पाटील यांनी केली.
'फडणवीस आणि दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा का याची माहिती घेत आहोत, या संदर्भात चौकशी करून भूमिका घेतली जाईल, असं सूचक विधान वळसे पाटील यांनी केले.
पोलिसांकडे काही इनपुट होते त्यानंतर चौकशी यासाठी बोलवले होते. चौकशी करण्यासाठी पुन्हा बोलवू असे सांगून संबंधित फार्मा कंपनी लोकांना सोडले आहे. चौकशीसाठी ताब्यात घेतले होते पण नंतर त्यांना सांगितले की चौकशी पुन्हा बोलवू शकतो. मुंबई पोलीस या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. नेमका साठा करत होते का, याची चौकशी केली जाईल, असंही वळसे पाटील म्हणाले.
खासगी किंवा राजकीय पक्ष यांना अशी कोणतीही खरेदी करता येत नाही. सरकारला रेमडेसीवीर फक्त देण्याचा अधिकार आहे. ओएसडी यांनी धमकी दिल्याचे मला माहिती नाही. संबंधित माल कंपनीकडे आहे. त्याचा वेगळा वापर केला जातो का याचा चौकशी केली जात आहे, असंही वळसे पाटील यांनी सांगितले.
मुनगंटीवार यांचं वळसे पाटलांना उत्तर
तर, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भूमिका आश्चर्यकारक आहे. पोलिसांवर दबाव टाकला असं म्हणायचं काहीच कारण नाही. अशीच उदाहरणं द्यायची असेल तर अनेक उदाहरणं देता येतील, अशी टीका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
वळसे पाटलांनी असं बोलणं म्हणजे सरकार किती नीच स्तरावर आलं आहे याचं हे उदाहरण आहे. अनेकदा एखाद्या व्यक्तीला पोलीस चौकशीसाठी बोलावतात तेव्हा ते एखाद्या आमदार किंवा खासदारांशी संपर्क साधतात आणि ते पोलिसांशी बोलत असतात, अशी सारवासारवही मुनगंटीवार यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.