महाराष्ट्र पोलिस दलाला 46 राष्ट्रपती पदके, आर.आर.आबांच्या भावाचा दुसऱ्यांदा सन्मान

महाराष्ट्र पोलिस दलाला 46 राष्ट्रपती पदके, आर.आर.आबांच्या भावाचा दुसऱ्यांदा सन्मान

15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली. करण्यात आली आहे. यंदा महाराष्ट्र पोलिस दलाला 5 शौर्य पदके मिळाली आहेत. तसेच 41 पोलिस अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट- 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली. करण्यात आली आहे. यंदा महाराष्ट्र पोलिस दलाला 5 शौर्य पदके मिळाली आहेत. तसेच 41 पोलिस अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. यात राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या भावाचा समावेश आहे. कोल्हापुरातील करवीर विभागातील पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील पाच अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे. यात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापुरातील करवीर विभागातील पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील, मुंबईतील साकिनाका विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेटले, पुण्यातील एसआरपीएफचे सहाय्यक कमांडंट हरिश्चंद्र काळे आणि कोल्हापूर जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना (विशेष सेवा) राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. रामचंद्र जाधव यांना हे तिसरे राष्ट्रपती पदक मिळाले आहे.

पाण्याची टाकी फुटून 3 जणांचा मृत्यू, पाहा घटनेचा CCTV

Published by: Sandip Parolekar
First published: August 14, 2019, 5:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading