...तर महाराष्ट्रात लागू शकते राष्ट्रपती राजवट - मुनगंटीवार

सत्ताच स्थापन झाली नाही तर राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 04:55 PM IST

...तर महाराष्ट्रात लागू शकते राष्ट्रपती राजवट - मुनगंटीवार

मुंबई 1 नोव्हेंबर : सत्तावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच भाजपचे जेष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केलंय. पुढच्या आठवड्याभरात राज्यात सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू शकते असा गर्भित इशाराच त्यांनी शिवसेनेला या वक्तव्यातून दिलाय. सत्ताच स्थापन झाली नाही तर राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही असंही ते म्हणाले. भाजप आणि शिवसेनेनं एकत्र येत विधानसभा निवडणूक लढवली. लोकांनी या दोनही पक्षांना सत्ता स्थापनेसाठी कौल दिला. त्या जनादेशाचा आदर करायला पाहिजे असंही ते म्हणाले. जनादेशाचा आदर झाला नाही तर ती लोकांशी प्रतारणा ठरेल. शिवसेनेनं लोकांची भावना समजून घेतली पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

शिवसेना खासदाराला घेरण्यासाठी शिवसैनिकच एकवटले, अडचणी वाढणार?

महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान झालं तर 24 तारखेला निकाल लागले. या निकालात सर्वात जास्त 105 जागा भाजपला मिळाल्यात तर भाजप आणि शिवसेनेनं मिळून बहुमताचा आकडा पार केलाय. मात्र सत्तेतल्या वाट्यावरून आता दोन्हीपक्षांमध्ये वादाची ठिणगी पडलीय. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद हवंय तर त्यासाठी भाजपची तयारी नाहीये. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि काही महत्त्वाची खाती देण्याची भाजपची तयारी आहे.

मात्र जास्तीत जास्त पदरात पाडून घेण्याची हीच वेळ असल्यानं सध्या दबावाचं राजकारण सुरू आहे. असं असलं तरी सर्व परिस्थिती निवळेल आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. तर कुठल्याही परिस्थितीत राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर शरद पवार, पिकांची केली पाहणी

Loading...

भाजपला नमतं घ्यावच लागेल

सरकार बनवायचं असेल तर भाजपला आज ना उद्या नमतं घ्यावंच लागेल. कारण सरकार बनवण्यासाठी आवश्यक बहुमत त्यांच्याकडे नाही, असं स्पष्ट करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आम्ही विरोधातच बसणार यावरही शिक्कामोर्तब केलं. पण  शिवसेना आणि भाजपने हा पोरखेळ लवकरात लवकर थांबवावा असं मला वाटतं. 9 तारखेपूर्वी नवं सरकार स्थिर असणं आवश्यक आहे, असंही पवार म्हणाले.

आपली खरी काळजी कोणती हे सांगताना ते म्हणाले, "सरकार लवकर येणं आवश्यक आहे. कारण 9 तारखेला अयोध्येचा निकाल आहे.  समाजातल्या सगळ्या घटकांमध्ये शांतता राहील याची काळजी घेणं, आवश्यक आहे."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 04:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...