मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राष्ट्रपतींनी राखला शिवप्रेमींचा मान, हेलिकॉप्टर गडावर उतरणार नाही, संभाजीराजेंनी दिली माहिती

राष्ट्रपतींनी राखला शिवप्रेमींचा मान, हेलिकॉप्टर गडावर उतरणार नाही, संभाजीराजेंनी दिली माहिती

शिवप्रेमींचा विरोध व त्यांच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रपती हे किल्ले रायगडावर न उतरता रोपवे ने गडावर जाणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली

  • Published by:  sachin Salve

रायगड, 04 डिसेंबर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या हेलिकॉप्टर रायगडावर उतरविण्यास शिवप्रेमींचा विरोधापुढे अखेर केंद्र सरकारला नरमाईची भूमिका घ्यावी लागली. राष्ट्रपती आता  रोपवेने किल्ले रायगडावर जाणार असल्याची माहिती भाजपचे राज्यसभेचे खासदार संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी दिली.

महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शिवदर्शनासाठी 06 डिसेंबर रोजी किल्ले रायगडावर येत आहेत. त्या अनुषंगाने मागील अनेक दिवसांपासून प्रशासनाची तयारी सुरू आहे. किल्ले रायगडावर हेलिकॉप्टर उतरल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर धुरळा व कचरा उडणार असल्याने   राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हॅलीकॉप्टर गडावर उतरवू नये अशी मागणी कोकण कडा मित्र मंडळ व तमाम शिवप्रेमी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.

शिवप्रेमींचा विरोध व त्यांच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रपती हे किल्ले रायगडावर न उतरता रोपवे ने गडावर जाणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे. शिवाजी महाराजांना  अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर रोपवेने येणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस सॅल्युट करतो,  असंही संभाजी राजे म्हणाले.

Green Peas: तुम्ही मटार भरपूर खाता ना? मग या गोष्टीही तुम्हाला माहीत असाव्यात

त्यामुळे शिवप्रेमींच्या मागणीला यश आले आहे. तर 25 वर्षांपूर्वी शिवप्रेमींनी आमरण उपोषण करून गडावरील हेलिपॅड उखडून फेकून दिले होते, आता राष्ट्रपतींच्या या भूमिकेने गडावर कधीच हेलिकॉप्टर उतरणार नाही हे सिद्ध झाले आहे.

पूर्वी किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिपॅड होते.  या ठिकाणी हॅलिकॉप्टर उतरताना अगर उड्डाण घेताना मोठ्या प्रमाणात धुळ, माती, केर कचरा उडतो. ही धुळ, माती होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडत असल्याने 1996 ला येथे उपोषण करून हा हॅलिपॅड येथून काढून टाकण्यात आला होता.  सुमारे 25 वर्षांनंतर शिवरायांच्या अवमानाचा तोच प्रश्न पुन्हा निर्माण होत असल्याने शिवप्रेमींकडून विरोध झाला होता.

First published: