कमला मिलमधल्या अग्नितांडवाबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

कमला मिलमधल्या अग्नितांडवाबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

कमला मिल कम्पाऊंडमधल्या हाॅटेल्सना लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. अख्ख्या देशभर याबद्दल हळहळ व्यक्त होतेय. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केलं.

  • Share this:

29 डिसेंबर : कमला मिल कम्पाऊंडमधल्या हाॅटेल्सना लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. अख्ख्या देशभर याबद्दल हळहळ व्यक्त होतेय. राष्ट्रपती, पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि  मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केलं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

मुंबईतल्या आगीच्या बातमी घटनेनं दुःख झालं..मृतकांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत..जखमी लोकांनी लवकर बरं व्हावं याकरता प्रार्थना..अग्निशमन दलाच्या लोकांनी खूप चांगलं काम केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईतल्या आगीच्या घटनेनं अत्यंत दुःख झालं..मृतांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत.. जखमींच्या तब्येतीकरता मी प्रार्थना करतो.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

मुंबईमधील कमला मिल कम्पाऊंडमध्ये भीषण आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पीडितांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या घटनेची त्वरीत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कमला मिलच्या आगीत लोकांचा मृत्यू झाल्याचे ऐकून अत्यंत दुःख वाटलं..महापालिका आयुक्तांना सखोल चौकशी कऱण्याचे आदेश दिले.

आदित्य ठाकरे

मृतांच्या परिवारासोबत माझ्य़ा संवेदना आहेत..हे खूपच क्लेषदायक आहे..आगीचे नियम न पाळणाऱ्यांविरोधात बीएमसी कडक कारवाई करेलच..मी आयुक्त अजॉय मेहता,आमदार सुनिल शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांशी बोललो..नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई होणारच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2017 11:57 AM IST

ताज्या बातम्या