शिक्षिकेनेच काढले चिमुकलीला चिमटे, मुंबईतल्या Preschoolमधला धक्कादायक प्रकार

शिक्षिकेनेच काढले चिमुकलीला चिमटे, मुंबईतल्या Preschoolमधला धक्कादायक प्रकार

मुलीने शाळेतून परत जाताना आपल्याला टिचरने मारल्याचं आईला सांगितलं आणि नंतर सगळा प्रकार उघडकीस आला.

  • Share this:

कल्याण 07 मार्च :  नोकरीवर जाणारे पालक आपल्या मुलाला विश्वासाने डे केअर सेंटर किंवा Preschoolमध्ये ठेवून जात असतात. मात्र मुंबईजवळचं महत्त्वाचं उपनगर असलेल्या कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार आढळून आलाय. Preschoolमधल्या शिक्षेकेनेच शाळेतल्या एका मुलीला चिमटे काढल्याचं उघडकीस आलंय. या घटनेची तक्रार पालकांनी शाळा प्रशासनाकडे केली मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला असून पालकांमध्येही भीतीही वातावरण निर्माण झालंय. हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही कैद झाला आहे. मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनीही अद्याप कुठलीही कारवाई केलेली नसल्यानं संताप व्यक्त होतोय.

नोकरदार आईवडील कामावर जाताना आपल्या मुलांना दिवसभर सांभाळण्यासाठी डे केअर सेंटरमध्ये सोडून जातात. तिथे मुलांना दिवसभर सांभाळण्यासोबतच शिकवलंही जातं. कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा इथल्या वसंत व्हॅली परिसरात अशीच लर्निंग कर्व्ह नावाची संस्था आहे. या संस्थेत दीपक माखीजा आणि वृत्ती माखीजा हे चार्टर्ड अकाउंटंट दाम्पत्याची आपली तीन वर्षांची मुलगी दिवसभरासाठी ठेवतात. दोघेही नोकरी आणि व्यवसाय करत असल्याने मुलगी ही दिवसभर या शाळेत राहाते.  मात्र 12 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुलीने शाळेतून परत जाताना आपल्याला टिचरने मारल्याचं आईला सांगितलं.

हे वाचा - यवतमाळमध्ये हेड कॉन्स्टेबलची आत्महत्या, पोलीस स्टेशनमध्येच घेतला गळफास

तिच्या हातावर नखं लागल्याच्या खुणाही होत्या. सगळी घटना कळाल्यानंतर  वृत्ती माखीजा यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानंतर शाळेचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता त्यात खुशबू नावाची शिक्षिका या मुलीला चिमटे काढताना स्पष्टपणे कैद झाल्याचं त्यांना आढळलं. तर दुसरीकडे लर्निंग कर्व्ह संस्थेचे क्लस्टर हेड निनाद मुंडे यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळे.

हे वाचा - काँग्रेसच्या नेत्यांचही ‘जय श्रीराम’, उद्धव ठाकरेंसोबत घेणार रामलल्लांचं दर्शन

यात आपल्या शिक्षिकेची काहीच चूक नसल्याचं सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेला आता महिना झाला आहे. तरीही पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यापलीकडे काहीही कारवाई केलेली नाही. याबाबत कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. या प्रकरणात तातडीने कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

 

 

First published: March 7, 2020, 12:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading