S M L

कामाला लागा,२०१९ ला जिंकायचंच!,उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश

Sachin Salve | Updated On: Jun 11, 2018 10:30 PM IST

कामाला लागा,२०१९ ला जिंकायचंच!,उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश

मुंबई, 11 जून : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देत आपल्याला २०१९ ला जिंकायचं आहे. तेही स्वबळावर त्यामुळे तयारीला लागा असा आदेशच  शिवसैनिकांना दिलाय.

येत्या २५ जून रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांसाठी मतदान होतेय. त्यासाठी शिवसनेच्या सर्व पदाधिकारी आणि मंत्री, खासदार आमदारांसाठी रंगशारदा सभागृहात मार्गदर्शन सभा झाली.  या सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाषणात २०१९ ला निवडणुका जिंकायच्या आहेत आणि त्या ही स्वबळावर असा नारा दिलाय.

त्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही स्वबळाचा नारा देत, येणाऱ्या निवडणुका स्वबळावरच लढवण्याचं कार्यकर्त्यांना सांगितलं. नाशिक विधानपरिषदेमध्ये मतांची संख्या कमी होती, पण लढलो आणि जिंकलो. आपल्याला २०१९ ला जिंकायचं आहे. तेही स्वबळावर त्यामुळे तयारीला लागा. अमित शाहांच्या भेटीनंतर आणि शरद पवारांच्या आॅफरनंतरही उद्धव ठाकरे यांचा स्वबळाचा नारा कायम राहिलाय.

हेही वाचा..

'ही तर नाटकं सुरू पण पिक्चर अभी बाकी हैं' - उद्धव ठाकरे

Loading...

अमित शहा-उद्धव ठाकरेंची बैठक संपली, युतीची चर्चा रंगली

अमित शहांची उद्धव ठाकरेंना 'ही' आॅफर, 'मातोश्री'वरील बैठकीचे 12 मुद्दे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2018 10:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close