Home /News /mumbai /

विधानभवनात तयारी पूर्ण, मविआ सरकार राहणार की जाणार?

विधानभवनात तयारी पूर्ण, मविआ सरकार राहणार की जाणार?

तर भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आमदारांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

तर भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आमदारांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

तर भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आमदारांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

    मुंबई, २९ जून : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यपालांनी (Governor Bhagat Singh Koshyari) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध (mva government floor test) करण्यासाठी आदेश दिले आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टात ५ वाजता सुनावणी होणार आहे तर दुसरीकडे विधानभवनात तयारी पूर्ण झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आज सकाळीच महाविकास आघाडीला पत्र पाठवले आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. एवढ्या कमी वेळेत तयारी कशी पूर्ण होणार अशी चर्चा रंगली होती. पण, विधानभवनाने तयारी पूर्ण केली आहे. तर भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आमदारांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे. तर बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा गट गुवाहाटीवरून निघाला आहे. आधी गोव्या मुक्कामी थांबणार आहे. त्यानंतर उद्या मुंबईमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकार आणि उपाध्यक्षांचे वकील सर्वोच्च न्यायालयात बहुमत चाचणीच्या विरोधात तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पार्टीवाला यांच्या द्विसदस्यीय खंडपीठ सुनावणी झाली. यावेळी अभिषेक मनू सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. राज्यपालांनी बोलावलेले अधिवेशन बेकायदेशीरपणे आहे, बहुमत चाचणी घेतली जाणार नाही. आज सायंकाळी सुनावणी घ्यावी. अशी विनंती सिंघवी यांनी केली. सुप्रीम कोर्टांने महाविकास आघाडीचे ऐकून घेतले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे. राज्यपालांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे -राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात आलेल्या बातम्या चिंताजनक आहेत. 39 आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे सविस्तर वृत्तांकन या माध्यमांनी केले आहे. -7 अपक्ष आमदारांचा ईमेल राजभवनाला 28 जून रोजी मिळाला आहे. या ईमेलमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहातील बहुमत गमावले असून लवकरात लवकर विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे -विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी 28 जून रोजी माझी भेट घेतली. त्यांनी मला राज्यातील परिस्थितीची माहिती दिली.मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बहुमत गमावल्याचा दावा त्यांनी केला आहे. -राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून सरकारला सभागृहाचा पाठिंबा आणि विश्वास आहे, याची खात्री करण्याचा मला अधिकार आहे.त्यामुळे मी 30 जून रोजी विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करावे असे निर्देश देतो. - 30 जून रोजी सकाळी 11 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे. या अधिवेशनात राज्य सरकारनं बहुमत सिद्ध करावे. विधानसभेचे कामकाज कोणत्याही परिस्थितीमध्ये गुरूवारी संध्याकाळी 5 वाजता समाप्त व्हावे. -काही नेत्यांची प्रक्षोभत वक्तव्य लक्षात घेता विधिमंडळाच्या परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात यावी -विधिमंडळाच्या कामकाजाचे प्रक्षेपण लाईव्ह करण्यात यावे. त्यासंबंधीची सर्व तयारी करावी
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या