मन हेलावून टाकणारी घटना, हॉस्पिटलमध्ये न घेतल्यामुळे गर्भवती महिलेनं रिक्षातच सोडला जीव

मन हेलावून टाकणारी घटना, हॉस्पिटलमध्ये न घेतल्यामुळे गर्भवती महिलेनं रिक्षातच सोडला जीव

सात महिन्याची गर्भवती असलेल्या या महिलेला मुंब्य्रातील 3 वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

  • Share this:

मुंब्रा, 31 मे : एका गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रिक्षातच मृत्यू झाल्याची अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना ठाण्यातील मुंब्य्रात घडली आहे.

मुंब्रा परिसरात राहणारी ही 7 महिन्याची गर्भवती महिला रुग्णालयात दाखल होण्यासाठी रिक्षातून वणवण भटकत होती. परंतु, तिला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिला. एका रुग्णालयातून नकार दिल्यानंतर या महिलेनं इतर रुग्णालयात धाव घेतली.पण, तिथेही तिला नकार मिळाला. अखेर एका रुग्णालयाच्या दारातच या महिलेचा रिक्षातच मृत्यू झाला. या मृत महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - वाईट होता लॉकाडाऊनचा चौथा टप्पा, प्रत्येक तासाची रुग्णांची आकडेवारी वाचून हादराल

22 वर्षीय या महिलेला अचानक त्रास होवू लागल्यामुळे तिचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल करण्या करता घेऊन गेले होते. पण शहरातील 3 रुग्णालयात या महिलेला  दाखल करुन घेतले नाही. एकीकडे कोरोनाच्या महामारीशी लढण्यासाठी ठाण्यात हजारो खाटांचे हॉस्पिटल उभारले जात आहेत. पण याच ठाण्यात एका गर्भवती महिलेचा उपाचाराअभावी मृत्यू होणे म्हणजे ठाण्यातील आरोग्य व्यवस्था किती ढिसाळ झाली आहे, हे स्पष्ट होतंय.

या प्रकरणी ठाणे महानगरपालिकेने मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 31, 2020, 2:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading