मुंबई, 26 जानेवारी : बदलत्या काळानुसार सौंदर्याच्या मापदंडात बदल होत असून, पूर्वी केवळ नटण्या-थटण्यावर भर देणाऱ्या महिला फिटनेसवर भर देत आहेत. ब्युटी पार्लर, कापड, दागिन्यांच्या दुकानांकडे वळणारी महिलांची पावले आता फिटनेससाठी जीमकडे वळत असल्याचे दिसत आहे. अशीच एक महिला आहे जिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. घरकाम करणारी महिला ते फिटनेस ट्रेनर असा प्रवास प्रीती सावंत यांनी पूर्ण केला आहे.
कशी झाली सुरुवात?
मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाऱ्या प्रीती सावंत या फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतात. सर्व सामान्य गृहिणी असलेल्या प्रीती सावंत या आधी घरकाम करत होत्या. मात्र त्यात पुरेसा पगार मिळत नव्हता. त्यातच काही कारणास्तव एका ठिकाणी घरकाम करत असताना अचानक त्यांना कामावरून काढण्यात आलं. अश्यावेळी हातात दुसर काम नसताना कामावरून काढल्यामुळे प्रीती विचारात होत्या. अचानक कामावरून काढून टाकल्याने दुसऱ्याच्या घरी जाऊन एक घरकाम करणारी स्त्री दुसरं काय काम करू शकते असा विचार त्या स्वतःबद्दल करत होत्या. मात्र, त्यांच्या भावाने जिम ट्रेनर होण्याचा सल्ला दिला आणि प्रीती तयारीला लागल्या. जिम ट्रेनर झाल्यावर 5 हजार रुपये सुरुवातीचे मानधन नंतर त्यांनी काही कोर्स केले आणि आता त्या घर व्यवस्थित चालू शकतात इतकं मानधन त्यांना मिळतं .
हजारहून अधिक लोकांना मी आतापर्यंत ट्रेनिंग दिले
प्रीती सावंत संगतात की, आपण मागची दोन वर्ष कोरोनामुळे घरीच अडकलो होतो. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर लॉकडाऊन संपल्यानंतर लोकांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता फिटनेस ट्रेनर्सची लोकांना गरज वाटू लागली आहे. मी मागची बारा वर्ष या क्षेत्रात काम करते आणि हजारहून अधिक लोकांना मी आतापर्यंत ट्रेनिंग दिले आहे. यात काही सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे.
ट्रेनर बनण्यासाठी कोणती कौशल्य असावीत?
याबाबत बोलताना प्रीती सावंत यांनी सांगितलं की, फिटनेस ट्रेनर होण्यासाठी, एखाद्याला योगा, व्यायाम आणि जिममध्ये वापरल्या जाणार्या उपकरणांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. याशिवाय, फिटनेस ट्रेनरला एरोबिक्स, लवचिकता प्रशिक्षण, पोषण, बॉडी मास इंडेक्स आणि प्रशिक्षण उपकरणांबद्दल चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. फिटनेस ट्रेनरला हे माहित असले पाहिजे की प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरानुसार व्यायाम आणि आहार योजना कशी ठरवायची हे त्याला माहित असले पाहिजे.
Video: मुंबईची चहा क्विन वंदना शिरसाट; पतीची नोकरी सुटल्यानंतरही खंबीरपणे पाठिशी राहिली उभी
शैक्षणिक पात्रता काय असावी?
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी, 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्हाला एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून फिटनेस उद्योगाशी संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम करावा लागेल. जर तुम्हाला वेट लिफ्टिंगच्या प्रशिक्षणात रस असेल तर तुम्ही या क्षेत्राशी संबंधित प्रगत अभ्यासक्रम करू शकता. फिटनेस क्षेत्रात प्रभावी होण्यासाठी, तुम्ही तंदुरुस्त राहण्यासाठी आणि इतरांनाही असे करण्यास मदत करण्यासाठी समर्पित असले पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.