राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

आज सकाळपासून अनेक शहरांमध्ये ढगाळ वातावरण आहे.

  • Share this:

13 मे : राज्यात अनेक शहरांमध्ये काल (शुक्रवारी) संध्यकाळपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून हा सिलसीला आजही कायम आहे. आज सकाळपासून अनेक शहरांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर चेंबूर, नवी मुंबई, डोंबविली, पनवेल या भागात आज सकाळी पाऊसही झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

तर मान्सूनपूर्व पावसातच मुंबईचा लोकलचे तीनतेरा वाजले. आज सकाळी घाटकोपमध्ये ओव्हरहेड वायरवर पाऊस पडल्याने काही वेळासाठी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. काल रात्रीही मध्य रेल्वेचे तीनतेरा वाजले होते.

दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील औढा नागनाथ शहरासह तालुक्यात विजेच्या कडकडाट सह पावसाने हजेरी हजेरी लावली. सकाळ पासुन आभाळ होते मात्र 8.30 च्या सुमारास पावसाने औंढा शहर आणि परिसरात दमदार हजेरी लावल्याने नागरिकांची तारंबल उडाली. सकाळी नागनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मात्र पावसाचा फटका बसला. नागरिकांना पावसापासून बचावासाठी पळापळ करावी लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2017 12:32 PM IST

ताज्या बातम्या