मुंबई, 1 नोव्हेंबर: अखेर माजी गृहमंत्री (Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) ईडी (ED) कार्यालयात दाखल झाले आहेत. ते ईडीच्या कार्यालयात (ED Office) दाखल झाल्याचा फोटो व्हायरल होताच. राजकीय वर्तुळात खळबळ माजली. विरोधी पक्षाकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या. भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना, कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही असे म्हणत देशमुख यांच्यावर निशाणा साधला.
'तपास यंत्रणापासून दूर जाता येत नाही. पाच-पाच समन्स दिल्यानंतरसुद्धा अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. हायकोर्टात, सुप्रिम कोर्टात दिलासा मिळेल असा त्यांचा प्रयत्न होता. कारवाईला स्थगिती मिळेल, असं त्यांना वाटत होतं. पण कोणत्याच कोर्टानं त्यांना स्थगिती दिली नाही. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. त्यांना आज ईडीसमोर हजर राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालेय की, माणूस कितीही मोठा असला तरी कायद्याचं पालन करत यंत्रणासमोर जावेच लागते.' अशी प्रतिक्रीया दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
अखेर अनिल देशमुख ED कार्यालयात हजर, व्हायरल झाला PHOTO; होणार कसून चौकशी
तत्पूर्वी, अनिल देशमुख यांनी ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर एक व्हिडीओ ट्विट करत आपला बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.
नमस्कार मी अनिल देशमुख बोलतोय. मला जेव्हा ईडीचा समन्स आला तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही अशा चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या.
ईडीने जेव्हा आमच्या सर्व घरांवर छापे टाकले, तेव्हा मी व माझ्या परिवाराने, माझ्या सहकाऱ्यांनी सर्वांनी ईडीला सहकार्य केलं. सीबीआयचे मला दोनदा समन्स आले. त्या दोन्ही वेळा मी स्वतः सीबीआयच्या कार्यालयात जाऊन माझा जबाब दिला. अजूनही माझी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आज मी स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झालोय.
मा. उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी साठी संपुर्ण सहकार्य करणार आहे. pic.twitter.com/c7OZ2MY1zS
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) November 1, 2021
असे सांगत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केलेत. माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह आज कुठे आहेत? प्रसार माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार परमबीर सिंह भारत सोडून परदेशात पळून गेले आहेत. आरोप करणाराच पळून गेला. आज पोलीस खात्यातील अनेक अधिकारी, व्यवसायिक यांनी पोलीस स्टेशनला परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या असल्याचे त्यांनी म्हटले आ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, BJP, ED, NCP, Pravin darekar