मुंबई, 13 जून: राजकारणात (Politics) काहीही घडू शकतं, राजकारण फार चंचल असतं, कधी काय होईल सांगू शकत नाही असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं. संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी टोला लगावला आहे.
प्रविण दरेकर यांनी म्हटलं, "संजय राऊत बोलतात तसे राजकारणातल्या गोष्टी नसतात. राजकारण कधीच चंचल नसत राजकीय नेते चंचल असतात. पण आपली वैचारिक भूमिका आणि विचारधारा चंचल नसावी. त्यांची विचारधारा चंचल झाली आहे आणि त्याचा त्यांनी विचार करावा असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
'कोणत्याही वाटाघाटी नाही, 5 वर्ष शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद राहणार', संजय राऊतांचं स्पष्टीकरणपाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा
मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे पाच वर्ष पूर्ण राहणार आहे यामध्ये कोणतीही वाटाघाट महाविकास आघाडी सरकारमध्ये होणार नाही असा निर्णय आघाडी स्थापन झाली तेव्हा एकमुखाने घेतला होता असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यावर प्रविण दरेकर म्हणाले, त्यांच्या पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा, पाच वर्ष जर मुख्यमंत्रिपद टिकलं तर घाटा कळेल, अजित दादांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपलेली नाहीये.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी शनिवारी जळगावात म्हटलं होतं, "राजकारणात काहीही घडू शकतं, राजकारण फार चंचल असतं, कधी काय होईल सांगू शकत नाही. शिवसेनेचं भाग्य आहे. गेल्या पाच वर्षात सत्तेत असून सुद्धा शिवसेना संपवण्याचे प्रयत्न झाले. की आपण जणू गुलामच होतो. दुय्यम स्थान दिलं जात होतं. आपली अवस्था खूप वाईट होती. मला सदैव असं वाटायचं की या राज्याला मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असावा."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.