मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'आप्पा, मी ऐकलं मला शिव्या दिल्या', हितेंद्र ठाकूरांची भेट घेताच प्रवीण दरेकरांचे कॅमेऱ्यासमोर उद्गार

'आप्पा, मी ऐकलं मला शिव्या दिल्या', हितेंद्र ठाकूरांची भेट घेताच प्रवीण दरेकरांचे कॅमेऱ्यासमोर उद्गार

भाजप नेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली.

भाजप नेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली.

भाजप नेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली.

मुंबई, 18 जून : विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीच्या (MLC Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत भाजपने (BJP) तब्बल पाच उमेदवार उभे केले आहेत. या पाचही जागांवर आपले उमेदवार निवडून येणार, असा भाजपचा दावा आहे. विशेष म्हणजे त्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी करायलाही सुरुवात केली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने त्यांचे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना जिंकवून आणत चमत्कार घडवून आणला होता. आतादेखील भाजप असाच चमत्कार घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. याच मतासाठी भाजप नेत्यांनी आज बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची भेट घेतली. भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar), गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. दरेकर आणि महाजन जेव्हा हितेंद्र ठाकूर यांच्या घराजवळ गाडीतून उतरले तेव्हा त्यांच्यात जी गंमतीशीर चर्चा झाली ती कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे.

दरेकर, महाजन आणि ठाकूर यांच्यात कॅमेऱ्यावर रेकॉर्ड झालेलं संभाषण :

प्रवीण दरेकर : आप्पा मी ऐकलं मला शिव्या दिलेल्या आहेत. म्हणून मला यावं लागलेलं आहे. प्रसादनं मला सांगितलं, असं असेल तर मी दहावेळा आप्पांकडे जातो.

गिरीश महाजन : रेकॉर्ड होतंय!

हितेंद्र ठाकूर : मी तर प्रसादला घातल्या असत्या. (त्यानंतर तीनही नेते हितेंद्र ठाकूर यांच्या निवासस्थानात प्रवेश करतात.)

(आमचा माणूस तुम्हाला ठार मारेल तेव्हा कळेल', साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी)

प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजनांचा लोकल ट्रेनने प्रवास

हितेंद्र ठाकूर यांची भेट घेण्यासाठी प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांनी आज रस्ते मार्गाने प्रवास न करता लोकल ट्रेनने विरारला जाणे पसंत केले. कारण रस्ते मार्गाने वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत असल्याने त्यांनी लोकलनेच प्रवास करण्याचं ठरवलं. त्यानुसार प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन चर्चगेट रेल्वे स्थानकावरुन लोकल ट्रेनमध्ये बसले. त्यानंतर ते विरार रेल्वे स्थानकावर उतरले. तिथे त्यांना घेण्यासाठी गाड्यांचा ताफा आलेला होता. त्या ताफ्यातून ते हितेंद्र ठाकूर यांच्या घरी दाखल झाले. यावेळी तीनही नेत्यांची खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली.

First published:

Tags: BJP, Girish mahajan, Maharashtra News, Maharashtra politics, Pravin darekar