मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /EXCLUSIVE : 'काळ चक्र फिरले', किरीट सोमय्यांसोबत एकाच मंचावर जाण्याबाबतच्या प्रश्नावर प्रताप सरनाईकांचं मोठं वक्तव्य

EXCLUSIVE : 'काळ चक्र फिरले', किरीट सोमय्यांसोबत एकाच मंचावर जाण्याबाबतच्या प्रश्नावर प्रताप सरनाईकांचं मोठं वक्तव्य

ठाणे महानगरपालिकेत आयुक्तांच्या भेटीला आलेल्या प्रताप सरनाईक यांनी News 18 लोकमतशी संवाद साधला.

ठाणे महानगरपालिकेत आयुक्तांच्या भेटीला आलेल्या प्रताप सरनाईक यांनी News 18 लोकमतशी संवाद साधला.

ठाणे महानगरपालिकेत आयुक्तांच्या भेटीला आलेल्या प्रताप सरनाईक यांनी News 18 लोकमतशी संवाद साधला.

ठाणे, 7 जुलै : "मी जे वारंवार सांगत होतो तेच चित्र आज दिसतंय याचा मला आनंद आहे", अशी प्रतिक्रिया पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिलीय. ठाणे महानगरपालिकेत (TMC) आयुक्तांच्या भेटीला आलेल्या प्रताप सरनाईक यांनी News 18 लोकमतशी संवाद साधला. काळ चक्र फिरले आहेत. त्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) काय आता कोणाच्याही व्यासपीठावर मी जायला मोकळा असल्याचे विधान आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे. किरीट सोमय्या मलाही भेटले. आमची भेट झाली. परंतु त्यांच्याबरोबर व्यासपीठावर जायचे की नाही? हा नंतरचा प्रश्न आहे. त्यामुळे यावर आताच भाष्य करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. आमची न्यायालयीन लढाई आहे. ती मी लढणार, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अभिनेता कंगणा राणौत आणि अन्वय नाईक प्रकरण मला चांगलेच भोवले होते. त्यानंतर माझ्यावर आणि परिवारावर ईडीची कारवाई झाली होती, असं प्रताप सरनाईक म्हणाले. विहंग गार्डन या इमारतीच्या मुद्यावरुन ठाण्यात सोमय्या विरुद्ध सरनाईक यांच्यातील संघर्ष थेट न्यायालयापर्यत गेलेला आहे. हे सगळं घडत असतानाच सरनाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मविआशी फारकत घ्या आणि भाजपसोबत जाण्याचे मत सरनाईकांनी मांडले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर प्रताप सरनाईक देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असतांना राज्यात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस वाढत होती. त्यामुळे सर्व आमदारांच्या मनात खदखद होती. ती खदखद मी पत्रद्वारे उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली होती. मुख्यमंत्री आपला असतांनाही कामे राष्ट्रवादीची अधिक होत असल्याचे सर्व आमदारांचे म्हणणे होते. त्या पत्रची दखल घेतली गेली नव्हती. तसेच माझ्यावर जे संकट ओढावलं होतं त्यावेळेस देखील माझ्यासोबत कोणीच उभे राहिले नाही. वाढदिवसादिवशी नेहमी सोबत फोटो काढायचो. पण संकटात होतो तर साधा कोणी फोनही केला नाही, अशी खंत देखील यावेळेस आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

(राज बब्बर यांना 2 वर्षांची शिक्षा; एमपी एमएलए कोर्टाचा मोठा निर्णय)

माझ्या पत्राची दखल उद्धव ठाकरेंनी घेतली नाही. पण त्या पत्रची दखल शिवसेनेच्या 40 आमदारांनी आणि 10 अपक्ष आमदारांनी घेतली. तर, आज अभिमानची गोष्ट आहे की, ठाणे शहरातील आमदार एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. डोंबिवलीचा रिक्षावाला आमदार आहे आणि ठाण्यातील रिक्षावाला राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे रिक्षावाल्यांना चांगले दिवस आलेत. एमएमआरडीएमध्ये कथित घोटाळा जो कधी झालाच नव्हता. एमएमआरडीएने देखील शपथपत्रत सुरक्षा रक्षकांच्या बाबतीत असा कोणताही घोटाळा न झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ईडीची चौकशी मागे लागली. सर्वोच्च न्यायालयाने मला सरंक्षण दिले. मात्र राज्य सरकारकडून जे सहकार्य किंवा संरक्षण मला किंवा कुटुंबाला मिळाले नसल्याची खंत देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केली.

माझ्यावर ईडीची धाड पडली होती तेव्हा जे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान आले होते तेच जवान आज माझ्या सुरक्षेकरिता आहेत असं बोलून प्रताप सरनाईक यांनी एकप्रकारे ठाकरेंना टोला लगावला आहे.

किरीट सोमय्या यांनी मंत्रलयात देखील आरटीई अंतर्गत विहंग गार्डनची माहिती मागविण्यासाठी अर्ज केला होता. मला सुद्धा भेटले होते. माझ्यासोबत सेल्फी काढली होती. सोमय्या यांच्याविरोधातील लढाई ही न्यायालयीन आहे. त्यांनी माझ्यावर आरोप केलेत, केस टाकली. मी सुद्धा त्यांच्याविरोधात दोन केस टाकल्या आहेत. परंतु न्यायालयीन प्रक्रिया सुरुच राहील. मात्र त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसायचे की नाही, हा नंतरचा प्रश्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काळ कोणासाठी कधी थांबला नाही आणि काळचक्र हे कसे फिरेल हे सांगता येत नाही. परंतु जुन्या गोष्टींचे कित्ते गिरविण्यापेक्षा ठाण्याच्या विकासाचे आणि सुगीचे दिवस आलेले आहेत. त्यामुळे आता झाले गेले विसरुन जावे असे सांगत आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडे तीनशे कोटींचा निधी दिलाय ज्याचा वापर करुन मी माझ्या मतदार संघाचा विकास करणार, असंही ते यावेळेस बोलले.

First published:

Tags: Kirit Somaiya, Pratap sarnaik, Shiv sena