विधान परिषदेसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी,राणेंचा पत्ता कट

विधान परिषदेसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी,राणेंचा पत्ता कट

भाजपकडून राणेंना उमेदवारी मिळू शकते, अशा चर्चा सुरू होत्या. पण तसं झालं नाही, आणि उमेदवारीसाठी लाड यांची वर्णी लागलीये.

  • Share this:

27 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने प्रसाद लाड यांना उमेदवारी दिलीये. अनेक दिवसांच्या सस्पेन्सनंतर लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय.

विधान परिषदेच्या उमेदवारी कुणाला द्यायची ?, यासाठी रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 'वर्षा' बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. या बैठकीत लाड यांचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय.

आज सकाळी १० वाजता मुंबई भाजपच्या कार्यालयात लाड अणि दानवे पत्रकार परिषद घेणार आहेत. भाजपकडून राणेंना उमेदवारी मिळू शकते, अशा चर्चा सुरू होत्या. पण तसं झालं नाही, आणि उमेदवारीसाठी लाड यांची वर्णी लागलीये. विशेष म्हणजे विधानपरिषदेसाठी संख्याबळ लक्षात घेऊन राणेंनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांना उमेदवारी देणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, भाजपने विधान परिषदेची उमेदवारीचा 'प्रसाद' लाड यांना दिलाय.

कोण आहे लाड ?

प्रसाद लाड हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. सध्या ते प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहेत. मुख्यमंत्र्यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. मुंबै बँकेचे ते संचालक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत असं बोललं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2017 09:12 AM IST

ताज्या बातम्या