प्रसाद लाड यांच्याकडे 210 कोटी 62 लाखांची संपत्ती !

प्रसाद लाड यांच्याकडे 210 कोटी 62 लाखांची संपत्ती !

प्रसाद लाड यांची एकूण संपत्ती २१० कोटी ६२ लाख असल्याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पुढे आलीये.

  • Share this:

28 नोव्हेंबर : विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अर्ज प्रसाद लाड यांनी अर्ज दाखल केलाय. प्रसाद लाड यांची एकूण संपत्ती २१० कोटी ६२ लाख असल्याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पुढे आलीये.

लाड यांच्याकडे ४७ कोटी ७१ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. लाड यांच्या एकूण जंगम मालमत्ता पैकी ३९ कोटी २६ लाख रुपये शेअर्स आणि बाँडच्या स्वरूपात गुंतवणूक केलेली आहे. त्यांची पत्नी नीता यांच्याकडे ४८ कोटी ९५ लाख, मुलगी सायली कडे एक कोटी १५ लाख, आणि मुलगा शुभम याच्याकडे २८ लाख २८ हजार रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.लाड यांच्याकडे ५५ कोटी ८६ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

त्यामध्ये पाथर्डी तालुक्यातील शेतजमीन, मुंबईतील सायन येथील एक प्लॉट, पुण्यातील एरंडवणे येथील एक कार्यालय, दादर येथील एक व्यवसायिक इमारत, दादरच्या प्रसिद्ध कोहिनुर मिल इमारत मधील सदनिका आणि माटुंगा येथील एक निवासी इमारत यांचा समावेश आहे. लाड यांच्या पत्नीकडे ५४ कोटी ९४ लाखाची स्थावर संपत्ती आहे. त्यामध्ये खालापूर येथील शेत जमीन, माटुंगा येथील व्यवसायिक इमारत, चेंबूर येथील निवसी इमारत या स्थावर मालमत्ताचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त लाड कुटुंबीयांकडे सामूहिक अशी १० कोटी ४५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ताही आहे. लाड कुटुंबीयांच्या संपत्तीचा जसा आकडा मोठं आहे, तसंच त्यांच्यावरील कर्जाचा आकडा देखील मोठा आहे. प्रसाद लाड यांच्यावर ४१ कोटी ४८ लाखांचे कर्ज आहे. पत्नी नीता यांच्या नावे ४२ कोटी २१ लाखाचे कर्ज आहे . मुलगी सायली हिच्या नावे १ कोटी ७ लाख तर मुलगा शुभम याच्या नावे १८ लाख ४९ हजार रुपयांचे कर्ज आहे. प्रसाद लाड वर्षाला चार कोटी २२ लाख इन्कम टॅक्स भरतात. तर त्यांची पत्नी १ कोटी ८४ लाख इन्कम टॅक्स भरत असल्याचे त्यानी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 10:40 AM IST

ताज्या बातम्या