मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

प्रणव मुखर्जींच्या पुस्तक प्रकाशनावरून कुटुंबीयांमध्ये वाद, नेमकं काय आहे कारण जाणून घ्या

प्रणव मुखर्जींच्या पुस्तक प्रकाशनावरून कुटुंबीयांमध्ये वाद, नेमकं काय आहे कारण जाणून घ्या

New Delhi: Former president Pranab Mukherjee during a function to release Subramanian Swamy's book "RESET: Regaining India's Economic Legacy" in New Delhi, Wednesday, Sept. 25, 2019. (PTI Photo/Kamal Singh)(PTI9_25_2019_000224B)

New Delhi: Former president Pranab Mukherjee during a function to release Subramanian Swamy's book "RESET: Regaining India's Economic Legacy" in New Delhi, Wednesday, Sept. 25, 2019. (PTI Photo/Kamal Singh)(PTI9_25_2019_000224B)

या पुस्तकाचे प्रकाशन थांबवावे अशी मागणी प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी (abhijeet mukharjee) यांनी केली आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 16 डिसेंबर : दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी(pranav mukharjee) यांच्या 'The Presidential Years' या पुस्तकाच्या प्रकाशनावरून त्यांच्या दोन मुलांमध्ये वाद सुरु झाले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन थांबवावे अशी मागणी प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी (abhijeet mukharjee) यांनी केली आहे. बॅनर्जी यांनी ट्विट(tweet) करुन संबंधित प्रकाशनाला या पुस्तकाचे प्रकाशन तूर्तास रद्द करण्याची मागणी केली आहे. य पुस्तकाचे प्रकाशन होण्याआधीच यामधील काही वादग्रस्त भाग समोर आल्यानंतर अभिजित यांनी याचे प्रकाशन थांबवण्याची विनंती केली आहे. यामध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग (manmohan singh) आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याविषयी वादग्रस्त भाग आहे. त्यामुळे ते प्रकाशित होऊ नये अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे प्रणव मुखर्जींचा मुलगा अभिजित आणि मुलगी शर्मिष्ठा यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. अभिजीत बॅनर्जी यांनी हे पुस्तक प्रकाशित होण्याआधी आपण एकदा वाचणार आहोत, असे म्हटले आहे. प्रणव मुखर्जी हयात असते तर त्यांनीही प्रकाशनापूर्वी हे पुस्तक एकदा वाचले असते, असेही अभिजीत यांनी म्हटले आहे. प्रकाशनाला ट्विट करत त्यांनी माध्यमांमध्ये काही भाग प्रकाशित कऱण्यासंदर्भात आपली कोणतीही लेखी परवानगी घेतली गेली नाही. तसेच काही भाग विशिष्ट हेतूने प्रकाशित केला गेला असल्याने प्रकाशन थांबवावे असे म्हटले. त्यानंतर शर्मिष्ठा मुखर्जी (sharmishtha nukharjee) यांनी ट्विट करत अभिजित यांना यामध्ये कोणताही वाद निर्माण न करण्याची विनंती केली. आपल्या वडिलांचे पुस्तक प्रकाशित होऊ देण्याची विनंती देखील त्यांनी यामध्ये अभिजित यांना केली. परंतु पब्लिक याकडे दोघांमधील राजकीय संघर्ष (political fight) म्हणून बघत आहे. त्यामुळे हे प्रकरण काय वळण घेते हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. हे वाचा-तुमची कहाणी सांगा आणि मिळवा बक्षीस, पुणेकर विद्यार्थ्याचा अनोखा उपक्रम प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर अभिजित यांच्याकडे त्यांचा राजकीय वारसदार म्हणून पाहिले जात आहे. परंतु शर्मिष्ठा या आपल्या वडिलांच्या अधिक जवळ असल्याने त्या देखील या शर्यतीत आहेत. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असताना त्या त्यांच्याबरोबर परदेश दौऱ्यावर देखील जात असतं. त्याचबरोबर त्यांची वैयक्तिक डायरी देखील त्यांच्याकडे असे. त्यामुळे त्यांच्याकडे अजून काही महत्त्वाची माहिती देखील असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर प्रणव मुखर्जी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांच्या अधिकृत निवासस्थानी देखील शर्मिष्ठा मुखर्जी राहत होत्या. प्रणव मुखर्जी यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये देखील शर्मिष्ठा त्यांच्याबरोबर होत्या. प्रणव मुखर्जी आपल्या मुलीबरोबर अधिक कम्फर्टेबल असल्याने त्या त्यांच्याबरोबर होत्या. तर अभिजित आपल्या कामामध्ये व्यस्त होते. त्याचबरोबर प्रणव मुखर्जी यांच्या बंगालमधील जांगीपूर या लोकसभा मतदारसंघातून अभिजित हे निवडून आले आहेत. त्याचबरोबर प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर देखील त्यांची शोकसभा आयोजित करण्यापासून ते त्यांच्या मिराती या ठिकाणी असणाऱ्या वडिलोपार्जित घरी भेट देण्यापर्यंत सर्व ठिकाणी अभिजित यांनी पुढाकार घेतला होता. दरम्यान, या दोन्ही भावंडांमधील संघर्ष नवीन नाही. 2012 मध्ये देखील अभिजित यांनी एका बलात्कार प्रकरणावर भाष्य केल्यानंतर शर्मिष्ठा यांनी हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटलं होते. त्यांच्या या वक्तव्याशी कुटुंबाचा संबंध नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले होते. त्याचबरोबर प्रणव मुखर्जी हयात असताना देखील त्यांच्यातील अनेक वाद समोर आले होते. परंतु माध्यमांमध्ये या बातम्या येऊ नयेत याची त्यावेळी काळजी घेण्यात आली होती. परंतु आता प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर हा वाद वर आला असून प्रणव मुखर्जी यांचा राजकीय वारसदार कोण यावरून दोन्ही भावंडांमध्ये वाद होऊ शकतो.
First published:

पुढील बातम्या