जेव्हा आमदार रेल्वेने प्रवास करतात...

जेव्हा आमदार रेल्वेने प्रवास करतात...

बोरिवली विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे रोज सकाळी 9.09 ची चर्चगेट स्लो ट्रेन पकडतात. गाडी आणि पोलिसांसोबत त्यांचा ताफा घरून निघतो पण पुढचा प्रवास ते रेल्वेनं करतात.

  • Share this:

03 आॅगस्ट : रोज मुंबईकरांना असह्य धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागतो, वेळेत पोचण्यासाठी वेळेत लोकल पकडावी लागते, रस्त्यावरून म्हणाल तर प्रचंड खड्डयांमुळे वाहतूक कासवगतीनं सुरू आहे. हे सगळं आता कदाचित लोकप्रतिनिधींना कळू शकेल कारण आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे आमदारांनीच चक्क रेल्वेनं प्रवास करायचं ठरवलंय.

त्यामुळे बोरिवली विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे रोज सकाळी 9.09 ची चर्चगेट स्लो ट्रेन पकडतात. गाडी आणि पोलिसांसोबत त्यांचा ताफा घरून निघतो पण पुढचा प्रवास ते रेल्वेनं करतात.

धावत जाऊन गाडी पकडणं, बसायला जागा मिळाली नाही तर चौथ्या सीटवर बसणं अशी पक्क्या मुंबईकरांची कला आता त्यांना जमायला लागली आहे. ते बसतात आणि त्यांचे स्वीय सहाय्यक,पोलीस गाडीत उभे राहतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2017 02:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading