रिक्षा चालकांच्या मदतीला स्थानिक आमदार आले धावून

रिक्षा चालकांच्या मदतीला स्थानिक आमदार आले धावून

कोरेगाव भीमा इथल्या दंगलीनंतर मुंबईतील चेंबूरमधील घाटला इथल्या खारदेव नगर भागात रिक्षांची अशी परिस्थिती होती. बंदला पाठिंबा देऊन रस्त्याच्या बाजूला रिक्षा लावल्यानंतरही त्यांची तोडफोड करण्यात आली होती. यामुळे या भागात जवळपास १००हून अधिक रिक्षांचं नुकसान झालं.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, 10 जानेवारी : कोरेगाव भीमाच्या दंगलीनंतरच्या महाराष्ट्र बंदमध्ये मुंबईत अनेक रिक्षांचं नुकसान झालं. पण या चेंबूरमध्ये या रिक्षाचालकांच्या मदतीला एक हात पुढे आला आणि रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळाला.

कोरेगाव भीमा इथल्या दंगलीनंतर मुंबईतील चेंबूरमधील घाटला इथल्या खारदेव नगर भागात रिक्षांची अशी परिस्थिती होती. बंदला पाठिंबा देऊन रस्त्याच्या बाजूला रिक्षा लावल्यानंतरही त्यांची तोडफोड करण्यात आली होती. यामुळे या भागात जवळपास १००हून अधिक रिक्षांचं नुकसान झालं.

हे नुकसान कसं भरुन काढायचं हा प्रश्न पडल्यावर रिक्षा चालकांच्या मदतीला धावून आले ते इथले शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश फातर्पेकर. पूर्वी या भागात रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष असलेल्या फातर्पेकर यांनी या भागातल्या जवळपास ७५ ते ८० रिक्षा चालकांना रिक्षांच्या फुटलेल्या काचा बसवून देण्यासाठी आर्थिक मदत केली.

बेताचीच आर्थिक परिस्थिती असलेल्या रिक्षा चालकांना या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आणि या मदतीमुळेच महाराष्ट्र बंदच्या दुसऱ्या - तिसऱ्या दिवशीच त्यांच्या रिक्षा पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या.

First published: January 10, 2018, 11:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading