Home /News /mumbai /

शिंदे गटाने भाजपमध्ये प्रवेश करावा, मगच सरकार स्थापन करु; भाजपची अट? प्रकाश आंबेडकरांचं ट्वीट

शिंदे गटाने भाजपमध्ये प्रवेश करावा, मगच सरकार स्थापन करु; भाजपची अट? प्रकाश आंबेडकरांचं ट्वीट

एकनाथ शिंदे आपला वेगळा गट स्थापन करुन भाजपसोबत जात सत्ता स्थापन करतात की भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत सत्ता स्थापन करतात हे लवकरच स्पष्ट होईल.

    मुंबई, 23 जून : राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कुणीही ठोस काही बोलू शकत नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष आहे. शिंदे गट भाजपसोबत (BJP) जात सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र हे समीकरण कसं जुळणार याचे देखील वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही एक ट्वीट करत भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे?" FB LIVE वर भावनिक आवाहन, सामनाच्या अग्रलेखातून कडक इशारा; कशी आहे ठाकरी रणनीती? त्यामुळे आता एकनाथ शिंदे आपला वेगळा गट स्थापन करुन भाजपसोबत जात सत्ता स्थापन करतात की भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत सत्ता स्थापन करतात हे लवकरच स्पष्ट होईल. राज्यातील राजकीय पेच सुप्रीम कोर्टात; पक्षांतर करणाऱ्या सर्व आमदारांवर कारवाईची मागणी एकनाथ शिंदेना भाजपची ऑफर? भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय 12 मंत्रिपदांची ऑफरही त्यांच्या गटाला आहे. त्यामुळे सध्या सहा मंत्रिपदं असलेल्या शिंदे गटाल एकूण मंत्रिमंडळाच्या 25 टक्के हिस्सा देण्याची ऑफर भाजपकडून असल्याचं बोललं जात आहे. 42 शिवसेना आमदार आणि 8 अपक्ष असे एकूण 50 जण शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं समोर येत आहे. संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या या शिवसेना गटाचं पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Prakash ambedkar, Shivsena, Uddhav thacakrey

    पुढील बातम्या