S M L

ओबीसी आरक्षणासाठी आंबेडकर आक्रमक, शिवाजी पार्कवर धडकणार

आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच आता यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनीही उडी घेतली आहे.

Updated On: Feb 10, 2019 04:21 PM IST

ओबीसी आरक्षणासाठी आंबेडकर आक्रमक, शिवाजी पार्कवर धडकणार

विवेक कुलकर्णी, मुंबई, 10 फेब्रुवारी : शिवाजी पार्कवर 23 फेब्रुवारीला ओबीसी आरक्षण परिषद घेणार आहे, अशी घोषणा भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. समुद्रावरील जलवाहतूक, पर्यटन, आधुनिक सागरी व्यापार, सागरी नोक-या, सागरी नौदल, नौदल यामध्ये मच्छीमारांना ३० टक्के आरक्षण हवं आहे.

आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच आता यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर आगामी काळात वातावरण तापण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ओबीसी परिषद कशासाठी?

- मुंबईत आगरी,कोळी, भंडारी आणि ईस्ट इंडियन आदिवासी यांची 200 गावठाणे आहेत. त्यांचे सीमांकन करुन भूमिपूत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत, त्यांना स्वयंविकासाचा अधिकार सरकारने द्यावा. याचप्रमाणे झोपडपट्ट्यांचा विकासही गावठाण हक्क कायद्याने व्हावा

- क्लस्टर आणि एसआरएला विरोध

Loading...

- कोस्टल रोड प्रकल्प, न्हावा शेवा, सी लिंक, शिवस्मारक प्रकल्प यात बाधित होणा-या मच्छीमार बांधवांचं पुनर्वसन भूसंपादन कायदा 2013 नुसार आणि फायदा चार पट देण्यात यावा

- आधुनिक बंदरे, आधुनिक बोटी, बिनव्याजी कर्ज मच्छीमारांना देण्यात यावं, सागरी उद्योग, नौदलाचे सागरी शिक्षण देण्यासाठी मरिन विद्यापीठ सुरु करण्यात यावं

'मुंबईच्या मूळ निवासींच्या जागांवर डोळा असल्यामुळे तिथे एसआरए प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण गावठाणाच्या ठिकाणी एसआरए प्रकल्प राबवता येणार नाही. मुंबईच्या मूळ निवासींना मुंबई बाहेर काढण्याचं हे षडयंत्र आहे,' असा घणाघातही आंबेडकरांनी केला आहे.


Special Report : माढ्याचा तिढा, पवारांचा विडा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2019 04:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close