खोटारडा आणि फसवणारा पंतप्रधान हवा आहे का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

खोटारडा आणि फसवणारा पंतप्रधान हवा आहे का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

नोटबंदीतून काळा पैसा गोरा करण्याचं कारस्थान भाजपने केलं अशी टीका करत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी काळे पैसे वाल्यांना लुटलं असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 26 एप्रिल : नोटबंदीतून काळा पैसा गोरा करण्याचं कारस्थान भाजपने केलं अशी टीका करत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी काळे पैसे वाल्यांना लुटलं, पुन्हा सत्ता दिली. आता ते सफेद पैसे वाल्यांनादेखील लुटतील. मोदी खोटारडे आहेत. तुम्हाला खोटारडा आणि फसवणारा पंतप्रधान हवा आहे का असा सवाल प्रकाश आंबेडकर जनतेसमोर उपस्थित केला.

भिवंडी लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण सावंत यांच्या प्रचार सभेसाठी प्रकाश आंबेडकर आणि असद्दुदीन ओवेसी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी विरोधकांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली.

भिवंडी टेकस्टाईल हब आहे. पण सत्ताधा-यांनी याकडे दुर्लक्ष केलं. चिनची स्पर्धा भिवंडीतील यंत्रमाग उद्योग करू शकतो. पण याकडे कोणी लक्ष देत नसल्याची टीका आंबेडकरांनी केली. त्र्यंबकेश्वर इथून पाणी गुजरातकडे वळवलं पण नाशिक जिल्ह्यात पाण्याच्या टाकण्यावरून हाणामाऱ्या झाल्या हीच परिस्थिती भिवंडी लोकसभा क्षेत्रात आहेत. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

उरलेल्या भारतात दुष्काळ होईल पण कोकणात कधी दुष्काळ पडत नाही. येथील पाण्याचं नियोजन मुंबईसाठी होतं पण येथील जनतेला तहानलेले ठेवतात. म्हणून आदिवासी शेतकरी स्थलांतरीत होत असतो. भिवंडी भागाचा विकासात्मक कायापालट झालाच नाही. फक्त बांधकामं वाढली. पाण्याचं नियोजन नसल्यानं भविष्यात शहरात पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा : विखेंच्या राजीनाम्याचा काँग्रेसला धसका, आजची राहुल गांधींची सभा उत्साह वाढवणार का?

'प्रियांका गांधींनी केवळ हवा केली, मोदींना आव्हान दिले असते तर प्रचाराला गेलो असतो'

पाच वर्षे विष प्राशन करून पाहिलं आहे, आता एकदा संधी देऊन बघा, असं आवाहन करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, RSS आणि भाजपचा पराभव करायचा असेल तर मुस्लिमांनी वंचित बहुजन आघाडीच्या माघे उभे राहिले पाहिजे. प्रियांका गांधी जर मोदींच्या समोर उभ्या राहिल्या असत्या तर त्यांच्या प्रचाराला गेलो असतो. मात्र, प्रियांका यांनी हवा केली आणि उमेदवारी केली नाही. मोदी त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला.

हेही वाचा : मावळमध्ये अजित पवारांची खेळी, गिरीश बापटांची निवडणूक आयोगाकडे धाव

BJP-RSS दुतोंडी सापासारखे.. मोदी सरकारने काळ्या पैशावर डल्ला मारला

प्रकाश आंबेडकर यांनी मनमाड येथे झालेल्या सभेतही मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. भाजप-आरएसएस हे दुतोंडी सापासारखे असून आरएसएस ही अतिरेकी संघटनेसारखी असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. केंद्र सरकार हे चोर व डाकूचे सरकार असून नोटाबंदी करून यांनी सर्वात जास्त काळ्या पैशावर डल्ला मारल्याचा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.

नोटबंदी सर्वात मोठा घोटाळा असून त्यातून जनतेची लूट करण्यात आली. पंतप्रधान हे गुजरातचे जास्त कौतुक करतात. त्यामुळे ते देशाचे पंतप्रधान आहे की फक्त गुजरातचे, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. प्रकाश आंबेडकरांनी नोटाबंदीवरुनही मोदी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला होता. ते म्हणाले, नोटांवर मालकी ही गव्हर्नरची असते. त्यामुळे पंतप्रधानाना नोटबंदी करण्याचा अधिकार कोणी दिला. याबाबत सुप्रीम कोर्टात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

VIDEO : भाजप नेत्याच्या विमानातून उतरवला पैशांनी भरलेला बाॅक्स, अनिल गोटेंचा गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 07:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading