हा नेता म्हणाला, 'सूर्याप्रमाणेच देशात BJP, RSS ला ग्रहण लागलंय'

हा नेता म्हणाला, 'सूर्याप्रमाणेच देशात BJP, RSS ला ग्रहण लागलंय'

देशाच्या आर्थिक स्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारने सीएए व एनआरसी हे मुद्दे उकरून काढले आहेत.

  • Share this:

मुंबई,26 डिसेंबर:वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला आहे. ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागलं आहे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ग्रहण लागलं आहे, त्याचा परिणाम संपूर्ण देशावर झाला आहे, अशा शब्दांत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने नागरिकत्व सुधारणा कायदा व एनआरसीच्या विरोधात गुरूवारी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना आंबेडकरांनी केंद्र सरकार घणाघाती टीका केली. सीएए कायदा हिंदूंवर परिणाम करणारा आहे. त्यास विरोध म्हणून हे आंदोलन आहे. पोलिसांनी विरोध केला तरी आम्ही आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना जिल्हा बंदी यासह काही महत्त्वाची माहिती सीएम ठाकरे यांना दिले. ते काळजी घेतील, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. देशाच्या आर्थिक स्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारने सीएए व एनआरसी हे मुद्दे उकरून काढले आहेत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे मुद्दाम संभ्रम तयार करतात, वेगवेगळी विधान देतात. नागरिकत्व कायद्याचा फटका केवळ मुस्लिमांना नव्हे तर देशातील हिंदूंनाही बसणार आहे. तब्बल 40 टक्के हिंदू या कायद्यामुळे अडचणीत येणार असल्याचे आंबेडकरांनी यावेळी सांगितले.

शेकडो ओबीसींनी स्वीकारला बौद्ध धम्म..

सीएए व एनआरसीच्या मुद्द्यावर मोदी, शहा खोटे बोलत आहेत. आरएसएस ही संघटनाच खोटेपणाच्या पायावर उभी आहे, अशी टीकाही त्यांनी केली. नागरिकत्व कायद्याविरोधातील आजचे धरणे आंदोलन यशस्वी होईल, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनात भटके-विमुक्त मोठ्या संख्येने भटके-विमुक्त सहभागी होणार आहेत. हे लोक रुढीपरंपरांच्या 'डिटेन्शन'मधून आता कुठे बाहेर आले असले तरी अजूनही त्यातील अनेकांचा संसार गाढव व घोड्याच्या पाठीवर सुरू आहे. त्यामुळे शेकडो ओबीसींनी बौद्ध धम्म स्वीकारला आहे. नव्या कायद्यामुळे ते पुन्हा एकदा 'डिटेन्शन'मध्ये जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2019 11:41 AM IST

ताज्या बातम्या