पाकव्याप्त काश्मीर भारताच्याच ताब्यात येणार का, प्रकाश आंबेडकरांचा सवाल

सरकारने जम्मू काश्मीरमधील विधानसभा रद्द केल्याने पाकव्याप्त काश्मीरचे काय होणार? तो भाग भारताच्याच ताब्यात येणार आहे का? असा सवाल यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 06:59 PM IST

पाकव्याप्त काश्मीर भारताच्याच ताब्यात येणार का, प्रकाश आंबेडकरांचा सवाल

मुंबई, 5 ऑगस्ट- जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेला कलम 370 नष्ट करण्यासाठी, केवळ संविधानातून काढण्यासाठी मोदी सरकारने सोमवारी संसदेत निवेदन दिले. त्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. मात्र, देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला असताना एवढा मोठा राजकीय निर्णय घेणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सांगितले की, कलम 370 (1) कायम राहील. कलम 370 (2) आणि कलम 370 (3) संपुष्टात येईल. परंतु कलम 370 (1) मधील जोडमध्ये असे म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमधील तत्कालीन राजा हरिसिंग यांच्यासोबत झालेल्या ठरावाविरोधात जाणार नाही. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील कलम 370 (2) आणि कलम 370 (3) संपुष्टात आले तरी कलम 370 (1) कायम आहे. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा एखादा निर्णय घेताना स्थानिक विधानसभेला विश्वासात घ्यावे लागणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे पाकव्याप्त काश्मीरचा. सरकारने जम्मू काश्मीरमधील विधानसभा रद्द केल्याने पाकव्याप्त काश्मीरचे काय होणार? तो भाग भारताच्याच ताब्यात येणार आहे का? असा सवाल यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी याचे प्रश्नांची उत्तरे देशातील जनतेला द्यावे, अशी मागणीही आंबेडकरांनी केली आहे.

कलम 370 हटवणे म्हणजे आगीशी खेळ..

जम्मू काश्मीरच्या जनतेला प्रेमानेही जिंकता आले असते. परंतु, मोदी सरकारने कलम 370 हटवण्याचा घेतलेला निर्णय आगीशी खेळण्यासारखा आहे. देशाचे आर्थिक धोरण आखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. यावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी मोदी आणि शहा जोडीने कलम 370 चा मुद्दा उकरून काढल्याची खोचक टीका आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवतानाच लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरसह लडाख हे केंद्रशासित प्रदेश असणार आहे.

कलम 370 हटवल्यानंतर काय होणार? पाहा हा VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 06:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...