S M L

चौकांची नावं बदलण्यातच नगरसेवक सर्वात पुढे, 'प्रजा'चा सर्व्हे

मार्च २०१२ ते डिसेंबर २०१६ दरम्यान रस्त्यांना आणि चौकांना नावं देणं किंवा नावं बदलणे हा मुंबईच्या नगरसेवकांसाठी सर्वात मोठा मुद्दा ठरलाय

Sachin Salve | Updated On: Apr 11, 2017 08:12 PM IST

चौकांची नावं बदलण्यातच नगरसेवक सर्वात पुढे, 'प्रजा'चा सर्व्हे

विवेक कुलकर्णी, मुंबई

11 एप्रिल : मार्च २०१२ ते डिसेंबर २०१६ दरम्यान रस्त्यांना आणि चौकांना नावं देणं किंवा नावं बदलणे हा मुंबईच्या नगरसेवकांसाठी सर्वात मोठा मुद्दा ठरला असल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाऊंडेशनने केलेल्या अभ्यासातून आढळून आली आहे.

मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांनी विचारलेल्या दर सहा प्रश्नांपैकी साधारण एक प्रश्न हा रस्त्यांना किंवा चौकांना नावं देणं किंवा नावं बदलण्याबद्दल होता ही माहिती समोर येतंय.

२०१६ मध्ये उपस्थित केलेल्या कार्यक्रम पत्रिकेच्या सर्व्हेनुसार ३५१ पैकी तब्बल २६३ प्रश्न हे रस्ते किंवा चौकांना नावं देणं किंवा नावं बदलणे याबद्दलचे होते. प्रजाचा हा अहवाल राजकीय पक्षांनी निवडणुकीदरम्यान प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची मनपा सभागृहात विचारलेल्या प्रश्नांशी तुलना केली आहे. याच वर्षी झालेल्या मुंबई मनपा निवडणूक प्रचारादरम्यान भाजपनं मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा मुद्दा उचलून धरला होता. प्रत्यक्षात मात्र पाच वर्षांत भाजपनं सभागृहात अवघे १८ प्रश्न विचारले आहेत.

याच कालावधीदरम्यान पालिकेतल्या प्रभाग समित्यांमध्ये ८८ नगरसेवकांनी वर्षाला पाच किंवा कमी प्रश्न विचारले. या वर्षी झालेल्या निवडणुकीत यापैकी १५ नगरसेवक निवडून आले आहेत.

Loading...
Loading...

प्रभाग समितीत पाच वर्षांमध्ये उज्ज्वला मोडक आणि ज्योत्स्ना परमार यांनी एकही विचारला नाही.

गेल्या पाच वर्षात दाखल झालेल्या तक्रारींपैकी ३९ टक्के तक्रारी प्रलंबित होत्या. प्रजाच्या अभ्यासातून असं आढळून आलं आहे की, रस्ते आणि खड्यांसंदर्भातल्या तक्रारींमध्ये २०११ नंतर वाढ झाली असून त्याच वर्षी मुंबई महानगर पालिकेनं व्हाईस आॅफ सिटीझन्स हे मोबाईल अॅप्लिकेशन लाॅन्च केलं होतं. २०११ ते २०१३ पासून तक्रारींमधे १५३८ ते ३८,२७९ इतकी वाढ झाली. त्यानंतर हे अॅप्लिकेशन बंद करण्यात आलं, त्यानंतर तक्रारींमधे घट झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 08:12 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close