मुंबई पालिकांच्या शाळांमध्ये 3 मुलांमागे 1 कुपोषित !

मुंबई पालिकांच्या शाळांमध्ये 3 मुलांमागे 1 कुपोषित !

मुंबई महापालिकेत शिकणाऱ्या मुलांच्या कुपोषणात 34 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचा धक्कादायक अहवाल आज प्रजा फाऊंडेशनने सादर केलाय.

  • Share this:

30 मे :  मुंबई महापालिकेत शिकणाऱ्या मुलांच्या कुपोषणात 34 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचा धक्कादायक अहवाल आज प्रजा फाऊंडेशनने सादर केलाय.

महापालिकेच्या शाळांत शिकणाऱ्या मुलामध्ये कुपोषणाचे प्रमाण दरवर्षी वाढत असून सध्या दर 3 मुलांमागे 1 मुलगा कुपोषित असल्याचा दावाही प्रजाच्या वतीने करण्यात आला.

2013 - 14 मध्ये 8 टक्के असणार कुपोषणाच प्रमाण 2015-16 मध्ये 34 टक्क्यांपर्यंत वाढलं असल्याने आता पेंग्विनच्या प्रकृती पेक्षा मुलांच्या तब्येतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं मतही प्रजा फाऊंडेशनचे मिलिंद म्हस्के यांनी व्यक्त केलं.

कुपोषण संदर्भातील ही सर्व माहिती माहिती अधिकार कायद्या अंतर्गत महापालिका प्रशासनाकडूनच मिळाल्याचा खुलासा यावेळी त्यांनी केला.

वर्ष 2013 - 14

एकूण विद्यार्थी - 4,04,251

कुपोषित विद्यार्थी - 11, 831

टक्केवारी - 8 टक्के

वर्ष 2014 - 15

एकूण विद्यार्थी - 3,97,085

कुपोषित विद्यार्थी - 53,408

टक्केवारी - 26 टक्के

वर्ष 2015 - 16

एकूण विद्यार्थी - 3,83,485

कुपोषित विद्यार्थी - 64,681

टक्केवारी - 34 टक्के

First published: May 30, 2017, 11:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading