SPECIAL REPORT : प्रदीप शर्मांचा एंट्रीने ठाकूर घराण्यात भूकंप, मैदानात उतरवले घरचे 3 सदस्य!

वसई, विरार पट्ट्यातली ठाकुर कटुंबीयांची सद्दी संपवण्यासाठी शिवसेनेनं यावेळी पहिल्यांदाच एन्काऊंटर फेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मैदानात उतरवलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 08:42 PM IST

SPECIAL REPORT : प्रदीप शर्मांचा एंट्रीने ठाकूर घराण्यात भूकंप, मैदानात उतरवले घरचे 3 सदस्य!

विजय देसाई, प्रतिनिधी

नालासोपारा, 05 ऑक्टोबर : नालासोपारा मतदारसंघातून प्रदीप शर्मा यांच्याविरोधात अख्ख्या ठाकूर कुटुंबानेच म्हणजेच तिघा जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहे. त्यामुळे शर्मांच्या यांच्याशी ठाकूर कुटुंबातला नेमका कोणता सदस्य टक्कर देणार याबाबतचा सस्पेंस अजूनही कायम आहे.

वसई, विरार पट्ट्यातली ठाकुर कटुंबीयांची सद्दी संपवण्यासाठी शिवसेनेनं यावेळी पहिल्यांदाच एन्काऊंटर फेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मैदानात उतरवलं आहे. शर्मा देखील आतापासूनच भाई हितेंद्र ठाकूरचा पॉलिटिकल एन्काऊंटर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. त्यामुळे प्रदीप शर्मा यांच्या विरोधात नेमकं कोणाला उतरावयचं याचा अंतिम निर्णय भाई ठाकूर घेऊ शकलेले नाहीत.

कदाचित म्हणूनच त्यांनी मुलगा क्षितिजच्या मतदारसंघात स्वतः पत्नी प्रविणाचाही उमेदवारी अर्ज भरला. पण या तिघांपैकी प्रदीप शर्मा यांच्याशी नेमकं कोण लढणार याबाबतचा सस्पेंस अजूनही कायम आहे. पण स्वतः मात्र, भाई ठाकूरांची तुलना थेट दाऊद इब्राहिमशी करून मोकळे झाले आहे.

प्रदीप शर्मांच्या या आरोपांना भाई ठाकूरांच्या समर्थकांनीही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलंय.

Loading...

नालासोपाऱ्यात खरंतर भाऊ ठाकुरांचे चिरंजीव क्षितिज हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे तेच शर्मांच्या विरोधात लढतील अशी सर्वांची अपेक्षा होती. पण समोरचा तगडा उमेदवार बघता भाई ठाकूर सध्यातरी कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नसावे. म्हणूनच त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून नालासोपाऱ्यातून स्वतःसह पत्नीचाही उमेदवारी अर्ज भरून ठेवला आहे. पण या तिघांपैकी एन्काऊंटर फेमशी नेमकं कोण दोन हात करणार हे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजेच 7 तारखेलाच स्पष्ट होऊ शकेल. पण ही लढत नक्कीच रंगतदार होणार हे निश्चित.

===================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2019 08:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...