प्रदीप जैन हत्याकांडात रियाझ सिद्दिकीला जन्मठेपेची शिक्षा

प्रदीप जैन हत्याकांडात रियाझ सिद्दिकीला जन्मठेपेची शिक्षा

प्रदीप जैन खून खटल्यात आरोपी रियाझ सिद्दीकीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. मुंबईच्या विशेष टाडा न्यायालयाने हा निकाल दिलाय. 7 मार्च 1995 रोजी प्रदिप जैन यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर : प्रदीप जैन खून खटल्यात आरोपी रियाझ सिद्दीकीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. मुंबईच्या विशेष टाडा न्यायालयाने हा निकाल दिलाय. याच खटल्यात अबू सालेम, मेहंदी हसन शेख, वीर्ंद्र कुमार झा यांना यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

7 मार्च 1995 रोजी प्रदिप जैन यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा कट रचण्याचा आरोप रियीझ सिद्दीकीवर ठेवण्यात आलाय. 1993 मुंबई साखळी स्फोटाप्रकरणीही रियाज सिद्दीकीला टाडा कोर्टाने आधीच दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर बिल्डर प्रदीप जैन हत्याकांडातही त्याला आता जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

विशेष म्हणजे याआधी रियाजला या खटल्यात सरकारी साक्षीदार बनवण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्याने आपली साक्ष फिरवली होती. त्यामुळे त्याला आरोपी बनवून पुन्हा खटला सुरु झाला, ज्यात तो दोषी आढळून आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2017 03:05 PM IST

ताज्या बातम्या