Home /News /mumbai /

मध्य रेल्वे मार्गावर उद्या अनेक लोकल रद्द, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डायव्हर्जन

मध्य रेल्वे मार्गावर उद्या अनेक लोकल रद्द, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डायव्हर्जन

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उद्या रविवार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक असणार आहे.

ठाणे, 2 जुलै : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उद्या रविवार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे मध्य रेल्वे मार्गावर (Central Railway) ब्लॉक असणार आहे. यावेळी येणाऱ्या रविवारी तर मध्य रेल्वेने विशेष ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे अनेक लोकल ट्रेन रद्द झाल्या आहेत. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डायव्हर्जन करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली आहे. मध्य रेल्वेने जारी केलेली ही माहिती उद्या लोकलने आणि बाहेरगावी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ नव्या पादचारी पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी रेल्वेने हा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे सकाळी 10.50 ते दुपारी 01.10 या कालावधीत अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर हा ब्लॉक घेण्यात आलाय. या ब्लॉकमुळे कल्याण येथून अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, पुढे कर्जतपर्यंत एकही लोकल धावणार नाही. या वेळेतील अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डायव्हर्जन करण्यात आलं आहे. (शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याहून मुंबईला रवाना, विमानातला पहिला VIDEO समोर) कोणत्या गाड्यांचे डायव्हर्जन करण्यात आलंय? अप एक्सप्रेस गाड्यांचे डायवर्जन - 17032 हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि 11014 कोईम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या गाड्या कर्जत-पनवेल-दिवा मार्गे वळवण्यात येतील, अशी माहिती जारी करण्यात आली आहे. कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी या गाड्यांना दिवा येथे दुहेरी थांबा दिला जाईल आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 ते 20 मिनिटे उशिरा पोहोचतील.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Central railway, Mumbai local

पुढील बातम्या