S M L

वाशी पुलाचं दुरुस्तीचं काम पुढे ढकललं; 1 फेब्रुवारीपासून पूल वाहतुकीसाठी बंद

नवी मुंबईतल्या वाशी खाडीपुलाच्या दुरुस्तीचं काम एक आठवडा पुढे ढकलण्यात आलं आहे. उद्या म्हणजेच 23 जानेवारी ऐवजी आता 1 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीपर्यंत वाशी खाडीपुलाचं दुरुस्तीचं काम सुरु असणार आहे.

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2018 09:40 AM IST

वाशी पुलाचं दुरुस्तीचं काम पुढे ढकललं; 1 फेब्रुवारीपासून पूल वाहतुकीसाठी बंद

23 जानेवारी : नवी मुंबईतल्या वाशी खाडीपुलाच्या दुरुस्तीचं काम एक आठवडा पुढे ढकलण्यात आलं आहे. उद्या म्हणजेच 23 जानेवारी ऐवजी आता 1 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीपर्यंत वाशी खाडीपुलाचं दुरुस्तीचं काम सुरु असणार आहे. या दरम्यान मुंबईला जाणारा मार्ग बंद राहणार आहे. नवी मुंबई पोलिसांनी काल एक पत्रक काढून ही माहिती दिली आहे.

मुंबई-पुण्याच्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग असलेल्या सायन-पनवेल महामार्गावरील नव्या वाशी खाडी पुलाची एक मार्गिका गुरुवारपासून पुढील २० दिवस दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. हे दुरुस्तीचं काम सुरु असतानाच्या कालावधीत मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील हलक्या वाहनांची वाहतूक जुन्या खाडी पुलावरून वळवण्यात येणार आहे. तर अवजड वाहनाची वाहतूक एरोलीमार्गे ठाणे-बेलापूर मार्गावरून पुढे वळवण्यात येणार आहे.

सायन-पनवेल मार्गावरील नव्या वाशी खाडी पुलावर मुंबईहून पुणे तसेच गोव्याला ये-जा करणाऱ्या वाहनांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वाहतुकीचे प्रमाण जास्त असलेल्या या मार्गावरील वाशी खाडी पुलाच्या लोखंडी जॉइंडरची झीज झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामाला येत्या गुरुवारपासून सुरुवार होणार असून ते पुढील २० दिवसांत टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2018 09:40 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close